Headlines
Home » जळगाव » Page 25

बालविश्व विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सद्गुरू भक्तराज शिक्षण संस्था संचलित बालविश्व विद्यालयाच्या क्रीडा महोत्सवास आज उत्साहात सुरवात झाली. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी मुख्य क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संदिप चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय खेळाडू नायब तहसीलदार अनिल पठाडे, संस्थेच्या संस्थापक…

Read More

काव्य रत्नावली चौकात ज्वलंत विषयांवर विविध पथनाट्ये सादर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे सायंकाळी पाच वाजता, ‘कायदेविषयक जागरूकता’ या संकल्पनेतून एस.एस. मणियार विधी महाविद्यालय जळगाव, रोटरी क्लब जळगाव आणि विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रस्ता सुरक्षा’ तसेच ‘कौटुंबिक हिंसाचार’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ इत्यादी या ज्वलंत विषयांवर आधारित विविध पथनाट्ये सादर करण्यात आलीत. यावेळी सय्यद, सचिव विधी सेवा…

Read More

दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दुसऱ्या जैन चॅलेंज ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा अनुभूती निवासी स्कूल येथे पार पडली. या स्पर्धेत २४ शाळांनी भाग घेतला होता. यामध्ये अनुभूती निवासी स्कूल च्या खेळाडूंनी फाईट ९ गोल्ड,५ सिल्व्हर, ३ कांस्य, पुमसे मध्ये मुलं-मुली मिळून पहिला क्रमांक प्राप्त करत ४ सुवर्ण, १ रौप्य,१ कांस्य पदकांची कमाई करत घवघवीत यश…

Read More

सोहम योग अँड नॅचरोपॅथी द्वारा सामूहिक सूर्यनमस्कार साधना आणि व्याख्यान संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा करण्यात आले होते. या निमित्ताने सूर्य उपासनेचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने सामूहिक सूर्यनमस्कार साधना आणि व्याख्यानाचे आयोजन मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सोहम योग विभागात करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित योगसाधक आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार…

Read More

२०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातून जळगाव जिल्ह्यासाठी विकासाच्या नव्या संधी मिळू शकतात !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच २०२५-२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि रोजगार वाढीस चालना देणारा असून, जळगाव जिल्ह्यातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देणारा आहे.  ■ कृषी व ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय • प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना:जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी…

Read More

ओरियन इंग्लिश मिडियम स्टेट बोर्ड स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीच्या ओरियन इंग्लिश मिडियम स्टेट बोर्ड स्कूल येथे ‘परंपरा- संस्कृती से समृध्दी की ओर’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक सोहळ्याच्या पहिल्या दिवशी नर्सरी ते चौथी पर्यंतच्या चिमुकल्यांनी रेट्रो टू मेट्रो या संकल्पने अंतर्गत विविध कलाविष्कार सादर केले. त्यामध्ये राजेश…

Read More

योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांच्या योग विषयक ग्रंथाचे प्रकाशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांच्या योगविषयक ग्रंथाचे मान्यवरांच्या  उपस्थितीत प्रकाशन झाले. डॉ. देवानंद सोनार यांनी लिहिलेल्या ‘हठप्रदीपिका : योगांग परिचय प्रचलित विधींसह’ या ग्रंथामध्ये स्वामी स्वात्माराम यांनी संस्कृत भाषेमधून श्लोकबद्ध केलेल्या हठप्रदीपिका या ग्रंथाचे प्रचलित विधिंसह वर्णन केलेले आहे….

Read More

शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनवाढ साध्य करावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

चिंचपुरा ( वास्तव पोस्ट ) : “कापूस उत्पादनात नवनवीन तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा समावेश करणे काळाची गरज असून शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनवाढ साध्य करावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चिंचपुरा येथील कापूस विशेष प्रकल्प अंतर्गत शेती दिन कार्यक्रमावेळी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, जळगावचे कार्यक्रम समन्वयक डॉ….

Read More

राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे क्रीडा आयुक्तांचे आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग तसेच संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याच्या युवा धोरणा अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार देण्यात येतात….

Read More

जिल्हा प्रशासन ‘गिलियन बॅरे सिंड्रोम’ नियंत्रणासाठी सज्ज ; प्रशासनाने तयारीसाठी घेतली कार्यशाळा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गिलियन बॅरे सिंड्रोम (GBS) तसेच अन्य आरोग्य संकटांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित…

Read More

जळगाव जिल्हा पोलीस दलाला मिळाले आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहनं ;विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते सदरच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे दि२७ रोजी पार पडला होता. त्यावेळी जळगाव जिल्हा पोलीस दलाला ०८ मोबाईल फॉरेन्सिक वाहने देण्यात आली होती. दरम्यान नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे हे जळगाव जिल्हा पोलीस दलाचो वार्षिक निरीक्षण करीता आले…

Read More

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज मधील MBA विद्यार्थ्यांची NSE मुंबईला भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज मधील एमबीए च्या विद्यार्थांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया मुंबईला नुकतीच भेट दिली. इंडस्ट्रिअल व्हीजीट उपक्रमांतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांचे प्रोत्साहन लाभले. विद्यार्थ्यांना एनएसई चे ट्रेनिंग पार्टनर पुर्व शाह यांनी शेअर मार्केट ट्रेडिंग, अल्गोरिदमिक ट्रेडिंग,…

Read More

उत्तराखंड येथे होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो संघाची घोषणा

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : इंडियन ऑलिंपिक असोसिएशन तथा उत्तराखंड ऑलिंपिक असोसिएशन द्वारा आयोजित ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र , मुंबई संघटनेचे २४ खेळाडू महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार असल्याचे ‘ताम‘ राज्य संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे यांनी सांगितले. ३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२५ आज दिनांक २८ जानेवारी १४ फेब्रुवारी या…

Read More

मणियार विधी महविद्यालयाचा एन.एस.एस. शिबिरातून सामाजिक जनजागृती संदेश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालय जळगाव आयोजित ७ दिवसीय एन.एस.एस. हिवाळी शिबिराचा चौथा दिवस शिरसोलीमध्ये उत्साहात पार पडला. शिबिराची सुरुवात योगा आणि प्रार्थनेसह करण्यात आली. सायंकाळी प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या सहकार्याने आर.टी.ओ. विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले व रस्ता सुरक्षा यावर कार्यक्रम व पथनाट्य सादर केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी…

Read More

अल्प बचत भवन मध्ये वाळू धोरणावर ३ फेब्रुवारी रोजी खुली चर्चा; नागरिकांनाही होता येणार सहभागी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील वाळू उपसा आणि त्यासंदर्भातील धोरणांवर चर्चा करण्यासाठी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:३० वाजता अल्प बचत भवन, जळगाव येथे खुली चर्चा आयोजित करण्यात आली आहे. या चर्चेत नागरिक, पर्यावरणप्रेमी, वाळू उपसा व्यावसायिक, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी आणि अन्य संबंधित घटक सहभागी होऊ शकतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली….

Read More
error: Content is protected !!