जळगाव
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’…
जैन हिल्सवर अनोखी ‘Morning Journey’ मध्ये ध्यान, संगीत, फ्री-फ्लो डान्सचा जळगावकरांनी घेतला आनंद! जळगाव, दि. २७ दीपक जाधव : जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसरात उगवत्या सूर्याच्या साक्षीने जळगावकरांनी धावपळीच्या जीवनशैलीतून काही क्षण स्वतःसाठी काढत शरीर आणि मनाला नवचैतन्य देणारा ‘Sunrise & Surrender – The Morning Journey’ हा अनोखा उपक्रमाची अनुभूती घेतली. ‘The Unplug Project’ च्या माध्यमातून…
“बंगला बदलला… अधिकारी बदलले… पण फलक मात्र अजूनही जुन्याच नावाचा!”
‘गुलमोहर’ बंगल्याबाहेर अजूनही ‘करणवाल’ राज! जळगाव | वास्तव पोस्ट वृत्तसेवा ज्या प्रशासनावर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाची आणि शिस्तीची जबाबदारी असते, तेच प्रशासन स्वतःच्या साध्या-साध्या गोष्टींबाबत किती ‘सुस्त’ असू शकते, याचा एक जळजळीत नमुना जळगावात पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांची बदली होऊन आणि त्यांच्या जागी नवीन अधिकारी रुजू होऊन आता महिना…
महात्मा गांधीजींचे विचार हे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक; कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे प्रतिपादन
समारंभावेळी विद्यार्थ्यांसह गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत एस.बोकारे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार, गीता धर्मपाल जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा “महात्मा गांधीजींचे विचार कालही प्रासंगिक होते आणि भविष्यातही ते दीपस्तंभाप्रमाणे (लाईटहाऊस) जगाला मार्ग दाखवत राहतील,” असे गौरवपूर्ण उद्गार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत…
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! ‘ई-केवायसी’ पूर्ण न केल्यास मे महिन्याचे वेतन रखडणार
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा शालार्थ आणि सेवार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शासनाच्या नवीन निर्णयानुसार, सर्व कर्मचाऱ्यांना आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण न केल्यास, संबंधित कर्मचाऱ्यांचे माहे मे २०२६ चे वेतन (जे जूनमध्ये देय आहे) आहरीत केले जाणार…
जळगाव जिल्हा परिषदेकडून ‘३ व ४ वर्ग कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया २०२६’ जाहीर
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव : जिल्हा परिषद जळगाव मार्फत सन २०२६ साठी गट-क (वर्ग ३) व गट-ड (वर्ग ४) कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने संबंधित सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश आणि समुपदेशनाचे…
कापूस वेचणाऱ्या महिलांच्या आरोग्यासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’चा जागर
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कापूस शेतीमध्ये राबणाऱ्या महिलांच्या आरोग्य आणि पोषणाचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस‘ हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. युनिसेफ, जिल्हा परिषद, कृषी विज्ञान केंद्र आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेतंर्गत ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच यशस्वीरीत्या संपन्न झाले. ९…
जळगाव मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाला चष्मा देण्याची गरज; स्वतःच्या इमारतीखालचं अतिक्रमण दिसेना!
शहरात क्रेनचा धाक ! मनपा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं विदारक दृश्य जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव शहरात सध्या समांतर रस्ता आणि महामार्गावरील अतिक्रमणांविरुद्ध महानगरपालिकेने ‘हातोडा’ मोहीम तीव्र केली आहे. एकीकडे हातावर पोट घेऊन बसलेले रस्त्यावरील गरीब विक्रेते आणि जुन्या टायर विक्रेत्यांवर कडक कारवाई करून रस्ते मोकळे केले जात असल्याचा दावा प्रशासन करत आहे….
रोखठोक : खाकीचा रुबाब फक्त ‘रील’वर? जळगावात गुन्हेगारांचे ‘रिअल’ राडे; पोलिसांचा वचक हरवला!
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव : सोशल मीडियावर शस्त्रे नाचवणारे किंवा भाईगिरीचे संवाद टाकणाऱ्या तरुणांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस सध्या धन्यता मानत आहेत. मात्र, दुसरीकडे जळगाव शहरात ‘रिअल’ भाईगिरीने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. दिवसाढवळ्या होणारी लूटमार, घरफोड्या आणि अवैध धंद्यांकडे होणारे सोयीस्कर दुर्लक्ष पाहता, पोलिसांचा धाक केवळ सोशल मीडियापुरताच मर्यादित राहिला आहे की काय?…
जळगाव यांत्रिकी विभागात नियमांची पायमल्ली? कार्यकारी अभियंता धनंजय पाटील यांच्याविरुद्ध तक्रार
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा शासनाचे बदली धोरण आणि भारतीय संविधानातील समतेच्या तत्त्वाचे उघड उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करत, जळगाव येथील यांत्रिकी विभागीय पथकाचे कार्यकारी अभियंता धनंजय वामन पाटील यांच्याविरोधात तक्रारीचा मोर्चा उघडण्यात आला आहे. नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन सुरेश रंधे यांनी नाशिक येथील यांत्रिकी मंडळाच्या मुख्य अभियंत्यांकडे ही…
गांधीवादी विचारवंत रामधीरजजींना ‘जमनाबेन लोकसेवक पुरस्कार’ जाहीर
धुळे l वास्तव पोस्ट वृत्तसेवा गांधीवादी विचारांच्या प्रसारासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे, उत्तर प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रामधीरज बालेश्वरजी सिंग यांना यंदाचा मानाचा ‘जमनाबेन लोकसेवक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रविवारी, ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी धुळे येथील बर्वे छात्रालयात एका विशेष सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.पुरस्कार सोहळा रविवार, दि.५ एप्रिल रोजी सायंकाळी…
ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्ह्याचा डंका! जिल्हाधिकारी आणि सीईओंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत गौरव
मुंबई/जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता, गतीमानता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात जळगाव जिल्हा प्रशासनाने संपूर्ण राज्यात बाजी मारली आहे. राज्य शासनाच्या ‘सेवाकर्मी प्लस’ आणि १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. या देदीप्यमान यशाबद्दल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
जळगाव क्रिकेट लीग – २०२६ : ऑक्शनमध्ये ऑलराऊंडर खेळाडूंसाठी संघांची तुफान झुंज!
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 चा बिगुल वाजला आहे. जैन हिल्सच्या परिश्रम हॉलमध्ये पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात (ऑक्शन) सहा संघांमध्ये अष्टपैलू (ऑलराऊंडर) खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळाली. या ऑक्शनमध्ये प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड आणि १९…
२१ व्या शतकातील गांधी: गांधी तीर्थ येथे विचारवंतांचे ‘मंथन’; तीन दिवसीय गोलमेज परिषद संपन्न
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे २६ ते २८ मार्च २०२६ दरम्यान ‘२१ व्या शतकातील गांधी: एक चौकशी’ या विषयावर तीन दिवसीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गांधी तीर्थ संकुलातील खान अब्दुल गफ्फार खान सभागृहात पार पडलेल्या या चर्चासत्रात गांधीजींच्या विचारांची समकालीन प्रासंगिकता आणि त्यांच्या जीवनशैलीचे पुनर्संकल्पन यावर सखोल खल करण्यात आला….
जळगाव क्रिकेट लीग-२०२६: ‘जळगाव किंग्स’ महागडी फ्रँचायझी, तर ओम मुंडे ठरला सर्वात महागडा खेळाडू!
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यातील क्रिकेटचा महाकुंभ मानल्या जाणाऱ्या ‘जळगाव क्रिकेट लीग २०२६ (JCL T-20 पर्व-२)’ चा बिगुल वाजला आहे. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे फ्रँचायझी आणि आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन जैन हिल्स येथील ‘परिश्रम हॉल’मध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या लिलावात ‘जळगाव किंग्स‘ ही…
शिक्षणाच्या स्वप्नांना ‘मालाबार’चा आधार! डॉ. बेंडाळे महाविद्यालयात ३१ विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीला बळ देण्यासाठी आणि सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी मालाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या (CSR) उपक्रमांतर्गत जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात गरजू व गुणवंत ३१ विद्यार्थिनींना एकूण २ लाख ६६ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे…
