BREAKING: रुपाली चाकणकर पायउतार! भोंदू खरात प्रकरणाने सरकारची नाचक्की; ‘वर्षा’वरून सुटले राजीनाम्याचे आदेश
मुंबई | वास्तव पोस्ट वृत्तसेवा नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळिकीचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर ही कारवाई झाली…
