Headlines
Home » जळगाव » जळगावमध्ये ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन

जळगावमध्ये ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा

जळगावकर नागरिकांसाठी रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोलीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  व आरोग्य तज्ज्ञ डॉ. सतीश गोगुलवार हे “आम्ही आमच्या आरोग्यासाठी” या विषयावर आरोग्याचे सूत्र मांडणार आहेत.

सदर आरोग्यविषयक व्याख्यान हे शुक्रवार दि. २७ मार्च २०२६ रोजी सायं. ७.३० वाजता, रोटरी हॉल, गणपती नगर, जळगाव येथे होणार असून या कार्यक्रमात सातपुड्यातील आदिवासी भगिनींनी मोहफुलांपासून बनविलेल्या विविध पौष्टिक पदार्थांचे सादरीकरण देखील करण्यात येणार आहे. निसर्गातून मिळणाऱ्या आरोग्याच्या खजिन्याची ओळख करून घेण्याची ही उत्तम संधी आहे.

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. ती जपण्यासाठी आणि आदिवासी संस्कृतीतील पौष्टिकतेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी व्याख्यान सर्वांसाठी खुले असून शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्यावतीने  करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!