Headlines
Home » जळगाव » बालविश्व विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरवात

बालविश्व विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सद्गुरू भक्तराज शिक्षण संस्था संचलित बालविश्व विद्यालयाच्या क्रीडा महोत्सवास आज उत्साहात सुरवात झाली. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी मुख्य क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संदिप चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय खेळाडू नायब तहसीलदार अनिल पठाडे, संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा भारती चौधरी, संस्थेचे डायरेक्टर सौरभ चौधरी, फरमान तडवी, मनोज भादूपोता यांची उपस्थिती होती.

प्रारंभी गुरूमाऊली सद्गुरू भक्तराज महाराज व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दिपप्रज्वलन मान्यवरांनी केले, नंतर खेळाडूंनी पथ संचलनद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली. विद्यालयाचे राष्ट्रीय खेळाडू मानराज चौधरी, विनय चित्ते, चिरायू भांडारकर, नितल तळेले यांनी क्रीडाज्योत मैदानात आणली. त्यावरून मुख्य क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. मानराज चौधरी या खेळाडूने विद्यार्थ्यांना शपथ दिली.

याप्रसंगी विद्यालयातील खेळाडूंनी स्पोर्ट्स डान्स, लाठी काठी, दांडपट्टा, तलवार, मल्लखांब याचे प्रात्यक्षिक सादर केले. सदर महोत्सवात क्रिकेट, धावणे, बॉल बॅलन्स, रस्सीखेच, बुक बॅलन्स, बकेट बॉल या खेळाचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभा तळेले, वैशाली जाधव यांनी तर आभारप्रदर्शन कविता पराते यांनी केले. यशस्वितेसाठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक धिरज जावळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!