Headlines
Home » जळगाव » Page 27

योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांच्या योग विषयक ग्रंथाचे प्रकाशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांच्या योगविषयक ग्रंथाचे मान्यवरांच्या  उपस्थितीत प्रकाशन झाले. डॉ. देवानंद सोनार यांनी लिहिलेल्या ‘हठप्रदीपिका : योगांग परिचय प्रचलित विधींसह’ या ग्रंथामध्ये स्वामी स्वात्माराम यांनी संस्कृत भाषेमधून श्लोकबद्ध केलेल्या हठप्रदीपिका या ग्रंथाचे प्रचलित विधिंसह वर्णन केलेले आहे….

Read More

शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनवाढ साध्य करावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

चिंचपुरा ( वास्तव पोस्ट ) : “कापूस उत्पादनात नवनवीन तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा समावेश करणे काळाची गरज असून शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनवाढ साध्य करावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चिंचपुरा येथील कापूस विशेष प्रकल्प अंतर्गत शेती दिन कार्यक्रमावेळी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, जळगावचे कार्यक्रम समन्वयक डॉ….

Read More

राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे क्रीडा आयुक्तांचे आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग तसेच संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याच्या युवा धोरणा अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार देण्यात येतात….

Read More

जिल्हा प्रशासन ‘गिलियन बॅरे सिंड्रोम’ नियंत्रणासाठी सज्ज ; प्रशासनाने तयारीसाठी घेतली कार्यशाळा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गिलियन बॅरे सिंड्रोम (GBS) तसेच अन्य आरोग्य संकटांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित…

Read More

जळगाव जिल्हा पोलीस दलाला मिळाले आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहनं ;विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते सदरच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे दि२७ रोजी पार पडला होता. त्यावेळी जळगाव जिल्हा पोलीस दलाला ०८ मोबाईल फॉरेन्सिक वाहने देण्यात आली होती. दरम्यान नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे हे जळगाव जिल्हा पोलीस दलाचो वार्षिक निरीक्षण करीता आले…

Read More

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज मधील MBA विद्यार्थ्यांची NSE मुंबईला भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज मधील एमबीए च्या विद्यार्थांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया मुंबईला नुकतीच भेट दिली. इंडस्ट्रिअल व्हीजीट उपक्रमांतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांचे प्रोत्साहन लाभले. विद्यार्थ्यांना एनएसई चे ट्रेनिंग पार्टनर पुर्व शाह यांनी शेअर मार्केट ट्रेडिंग, अल्गोरिदमिक ट्रेडिंग,…

Read More

उत्तराखंड येथे होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो संघाची घोषणा

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : इंडियन ऑलिंपिक असोसिएशन तथा उत्तराखंड ऑलिंपिक असोसिएशन द्वारा आयोजित ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र , मुंबई संघटनेचे २४ खेळाडू महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार असल्याचे ‘ताम‘ राज्य संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे यांनी सांगितले. ३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२५ आज दिनांक २८ जानेवारी १४ फेब्रुवारी या…

Read More

मणियार विधी महविद्यालयाचा एन.एस.एस. शिबिरातून सामाजिक जनजागृती संदेश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालय जळगाव आयोजित ७ दिवसीय एन.एस.एस. हिवाळी शिबिराचा चौथा दिवस शिरसोलीमध्ये उत्साहात पार पडला. शिबिराची सुरुवात योगा आणि प्रार्थनेसह करण्यात आली. सायंकाळी प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या सहकार्याने आर.टी.ओ. विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले व रस्ता सुरक्षा यावर कार्यक्रम व पथनाट्य सादर केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी…

Read More

अल्प बचत भवन मध्ये वाळू धोरणावर ३ फेब्रुवारी रोजी खुली चर्चा; नागरिकांनाही होता येणार सहभागी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील वाळू उपसा आणि त्यासंदर्भातील धोरणांवर चर्चा करण्यासाठी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:३० वाजता अल्प बचत भवन, जळगाव येथे खुली चर्चा आयोजित करण्यात आली आहे. या चर्चेत नागरिक, पर्यावरणप्रेमी, वाळू उपसा व्यावसायिक, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी आणि अन्य संबंधित घटक सहभागी होऊ शकतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली….

Read More

महिला बचत गटांना ५०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट ; बँकांनी महिलांना वैयक्तिक कर्ज द्यावे : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली डीएलसीसीची बैठक संपन्न जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधावी यासाठी ५०० कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला उद्योजकांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून “लखपती दीदी” उपक्रमाला गती मिळेल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले. जिल्हाधिकारी…

Read More

मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात “मराठी भाषा: उगम आणि भाषा संवर्धन” या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय विभागाचे कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे होते. विद्यार्थ्यांसह अधीक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती….

Read More

संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश!

गांधी रिसर्च फाऊंडेशन व परिवर्तन आयोजित ‘बंदे में है दम’ संगीतमय मैफिलीतुन महात्मा गांधीजींना अभिवादन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित व परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में हे दम’ हा संगीतमय कार्यक्रम महात्मा गांधी उद्यान येथे करण्यात आले. महात्मा गांधी अनेक समज गैरसमज, अनेक माहीत नसलेल्या…

Read More

शिष्यवृत्तीकरिता महाडीबीटी वर आधार नोंदणी नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज करता येणार !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करताना आधार नोंदणी न केल्याने महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नामंजूर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे आधार प्रमाणपत्र सादर करून ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत प्रकल्प अधिकारी कार्यालयात शिष्यवृत्ती/फ्रीशीपकरिता ३१ जानेवारी पर्यंतच्या मुदतीत ऑफलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केला…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात ३ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनांक अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत…

Read More

प्रा.उमेश ठाकरे यांच्या हस्ते भूगोल मंडळाचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भूगोल दिनाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी प्राध्यापक उमेश ठाकरे स्वामी विवेकानंद विद्यालय (स्वायत्त्य) जळगाव यांच्या हस्ते भूगोल मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. ठाकरे यांनी भूगोल दिनाचे महत्त्व, भौगोलिक माहिती त्याचबरोबर सूर्याचे भासमान भ्रमण इत्यादी विषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी होते. त्यांनी भूगोलाचा इतर विषयाशी कसा…

Read More
Top
error: Content is protected !!