Headlines
Home » जळगाव » केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज मधील MBA विद्यार्थ्यांची NSE मुंबईला भेट

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज मधील MBA विद्यार्थ्यांची NSE मुंबईला भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज मधील एमबीए च्या विद्यार्थांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया मुंबईला नुकतीच भेट दिली. इंडस्ट्रिअल व्हीजीट उपक्रमांतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांचे प्रोत्साहन लाभले. विद्यार्थ्यांना एनएसई चे ट्रेनिंग पार्टनर पुर्व शाह यांनी शेअर मार्केट ट्रेडिंग, अल्गोरिदमिक ट्रेडिंग, लाईव ट्रेडिंग व एनएसई च्या कार्यप्रणाली बद्दल माहिती दिली.

या भेटीमुळे विद्यार्थ्यांना एनएसई द्वारा घेण्यात येणारे शेअर मार्केट संबंधित सर्टिफिकेट प्रोग्राम ची माहिती मिळाली. या सर्टिफिकेट कोर्स मध्ये एनआयएसएम सर्टिफिकेट कोर्स विद्यार्थ्यांच्या करिअर एन्हांसमेंट साठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. विशेषतः या कोर्स मुळे फायनान्स या विषयात करिअरच्या विविध संधीची परिपूर्ण मेजवानी व्यवस्थापन विभागाच्या विद्यार्थ्यांना मिळाली.

ही विजिट यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी एनएसई चे विजिट को-ऑरडीनेटर दुर्गेश देसाई आणि केसीई महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागाचे ट्रेनींग अँड प्लेसमेंट को-ऑरडीनेटर प्रा. हेमंत धनंधरे यांनी विशेष मेहनत घेतली.

त्यांना विभाग प्रमुख प्रा.हर्षा देशमुख तसेच प्रा.दिगंबर सोनवणे, प्रा.रेवती पाटील, प्रा.देवेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.संजय सुगंधी यांनी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे विशेष कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!