Headlines

दिपक जाधव

जैन हिल्स येथून शेतकरी जनजागृती रथ उपक्रमास आरंभ ; मंगळ ग्रह मंदीराचा स्तुत्य उपक्रम

शेतकऱ्यांपर्यंत माहिती व उच्च तंत्रज्ञान पोहचवु : अशोक जैन जळगाव | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळग्रह मंदीर संस्थान उपक्रम स्तुत्य आहे, या उपक्रमासाठी मी जैन इरिगेशनच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. मंगळग्रह सेवा संस्था,…

Read More

विद्यापीठाच्या परीक्षांचा पॅटर्न बदलणार ; नवीन शैक्षणिक धोरणानुसार ६०/४० गुणांची परीक्षा

सोलापूर | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– विद्यापीठाच्या परीक्षा सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार ८० गुणांची परीक्षा विद्यापीठ स्तरावर तर २० गुणांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेतली जाते. मात्रा यामध्ये आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदल होणार असुन त्यात आता विद्यापीठाकडून ६० गुणांची तर महाविद्यालयांकडून ४० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

Read More

धक्कादायक : राहत्या घरात गोणपाट मध्ये आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह

पाचोरा | दि १५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील वयोवृद्ध महिलेस गोणपाट मध्ये टाकून अज्ञाताने जीवे मारल्याची धक्कादायक घटना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर बाजारपेठेत मज्जिद शेजारी मंजाबाई भोई ( वय ८०) या वृद्धा एकट्याच राहत होत्या. आज सायंकाळी नेहमी प्रमाणे त्या बाहेर दिसल्या नाहीत,…

Read More

शाळा बंद पडल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यास ५० हजारांची लाच घेतांना रंगेहाथ अटक

नंदुरबार | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नवापुर शहर नगरपालिका हद्दितील शाळा बंद असल्या बाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षणाधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे. सतिष सुरेश चौधरी (वय ५२), जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक, नंदुरबार, वर्ग-१ असे लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना नवापूर शहर,…

Read More

पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीवर अपघात ; १ महिला जागीच ठार तर ३ जखमी

पाचोरा | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचोरा शहरात जारगाव चौफुलीवर जळगावकडे जातांना ट्रक आणि मोटरसायकलच्या अपघातात तीन जण जखमी झाले असुन एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. अपघातातील ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, भडगाव तालुक्यातील गिरड येथील रहिवासी शेख इस्माईल अब्दुल नबी मणियार…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन

पाचोरा | दि. १५ (वास्तव पोस्ट न्यूज ) – राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवात सहभागी होऊन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभागी होऊन त्यांना वंदन केले. स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजे संभाजी महाराज यांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानंतर…

Read More

कर्नाटकातील थिमक्का’चा झाडे लावा झाडे जगवा उपक्रम

सालुमरदा थिम्मक्का या कर्नाटकातील एक, ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा अशी महिला आहे, ज्या पर्यावरणासाठी दिलेल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी जगभरात ओळखल्या जातात. सालुमरदा ह्या अनेकांसाठी खरी प्रेरणा आहे आणि त्यांची कथा कार्य खरोखरच शेअर करण्यासारखं आहे. थिम्मक्का यांचा जन्म कर्नाटकातील एका लहानशा खेडेगावात अशा कुटुंबात झाला होता, ज्या कुटुंबात फारशी आर्थिक परिस्थिती नव्हती. आपल्या कुटुंबाला शेतीच्या…

Read More

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या ; शिक्षक संघटनांच्या मागणीला यश

मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुरु असतांना भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकांचे जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विधान परिषदेच्या २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसाठी १० जून रोजी मतदान होऊन १३ जून रोजी मतमोजणी होणार होती. आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकण्यात…

Read More

मतदान टक्केवारी वाढीसाठी घेण्यात आलेल्या अभिनव स्पर्धांचा निकाल जाहीर

जळगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदान वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी परीक्षक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. आज त्याचा निकाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केला. ◆ आकर्षक वेशभुषा नवयुवक मतदार (वयोगट…

Read More

जळगाव लोकसभा मतदार संघात ५८.४७% तर रावेर लोकसभा मतदार संघात ६४.२८% झाले मतदान

जळगाव | दि १४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवार दि. १३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण ५८.४७% तर रावेर लोकसभा मतदार संघात ६४.२८% मतदान झाले. सोमवार दि.१३ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला दोन्ही मतदार…

Read More

अनाधिकृत होर्डिंग बंद करा : डॉ. डी एल कराड, राज्य सचिव मंडळ सदस्य, माकप

नाशिक | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – काल घाटकोपर येथे अनाधिकृत होर्डिंग कोसळल्यामुळे १४ लोक मृत्युमुखी व ७५ पेक्षा जास्त जखमी झालेत. जाहिरातबाजीसाठी या लोकांचा बळी गेला. यापूर्वी पुण्यातही अशी घटना होऊन सहा लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आता वेळ आली आहे विचार करण्याची. याला जबाबदार कोण? महानगरपालिका प्रशासन ? राज्यातले सत्ताधारी ? की…

Read More

फैजपूर पोलिसांनी गहाळ झालेले १२ मोबाईल केले हस्तगत

जळगाव, दि.१३ ( विशेष प्रतिनिधी ) समाधान पाटील | फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीत या वर्षी आज पावेतो बरेच मोबाईल गहाळ झाल्याबाबत संबंधित मोबाईल धारकांनी तक्रार दाखल केलेल्या होत्या. पोलीस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, जळगाव अप्पर पोलीस अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपूर उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी वेळोवेळी मासिक क्राईम मिटिंग दरम्यान गहाळ मोबाईल हस्तगत…

Read More

मतदान करणाऱ्यांची विनामूल्य नेत्र तपासणी ; कांताई नेत्रालयाचा उपक्रम

जळगाव | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगावातील निमखेडी रोड वरील कांताई नेत्रालयातर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी दोन दिवस नेत्र तपासणी विनामूल्य केली जाणार आहे. जळगावातील जे मतदार मतदान केल्याची डाव्या हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखवतील, त्यांना नेत्र तपासणीत शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. ही सवलत दि.१३ व १४ मे या कालावधी करिता…

Read More

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव येथे अशोक जैन यांनी केले सपत्नीक मतदान

जळगाव | दि. १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. आज १३ मे रोजी महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात निवडणुका होत आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात जैन इरिगेशन्स सिस्टिम लिमिटेड चे चेअरमन अशोक जैन यांनी पत्नी ज्योती जैन यांच्यासोबत आज सकाळी ७:००…

Read More

अचूक नियोजनातून करण पाटलांना मिळणार वाढीव मताधिक्य; पाचोरा मेळाव्यात निर्धार

पाचोरा | दि ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सत्ताधार्‍यांबाबत जनतेत रोष असून प्रचार फेर्‍यांमध्ये लोक आपल्या सोबत राहतील असे दिसून आले आहे. तथापि, मतदानाआधीच्या शेवटच्या टप्प्यात गाफील राहू नका असा आवाहन वजा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाचोर्‍यात आयोजीत मेळाव्यात दिला. तर, अचूक नियोजन करून करण पाटील यांना वाढीव मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार देखील…

Read More
error: Content is protected !!