Headlines
Home » Archives for 2026-04-23

गहू खरेदी कोट्यात मोठी वाढ; मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना दिलासा

भोपाळ l वास्तव पोस्ट वृत्तसेवा मध्य प्रदेशातील गव्हाच्या वाढत्या उत्पादनाचा विचार करून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे गव्हाच्या खरेदी कोट्यात वाढ करण्याची मागणी केली होती. या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, खरेदी कोटा ७८ लाख मेट्रिक टनांवरून थेट १०० लाख मेट्रिक टन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती…

Read More

गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तातडीने सादर करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामे त्वरित पूर्ण करून, दुसऱ्या टप्प्याचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पहिल्या टप्प्यातील कामांचा आढावा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गोसीखुर्द जलाशयातील…

Read More

महाराष्ट्राची ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप; ५ हजार २०० कोटींच्या जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार

मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा राज्यातील ऊर्जा क्षमता वाढवण्यासाठी आणि शाश्वत वीज निर्मितीसाठी जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. सुमारे ५ हजार २०० कोटी रुपयांच्या या करारांतर्गत तीन उदंचन (पंप्ड स्टोरेज) जलविद्युत प्रकल्प उभारले जाणार असून, यामुळे महाराष्ट्राच्या ऊर्जा पायाभूत…

Read More

राज्यात ३७ स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे कार्यान्वित होणार; मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा राज्यातील वाहनांची फिटनेस तपासणी आता अधिक पारदर्शक आणि अद्ययावत होणार आहे. ही तपासणी केवळ नोंदणीकृत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राद्वारे (एटीएस) केली जावी, यासाठी राज्यात ५३ केंद्रे उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ही सर्व कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे आता पारंपरिक मानवी तपासणी पद्धती…

Read More

JCL T-20: चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स आणि जळगाव कोगटा किंग्सची विजयी घोडदौड

ओम मुंडे याला प्लेअर ऑफ मॅच पुरस्कार प्रदान करताना अभंग जैन, अमित आहुजा, ज्ञानेश्वर पाटील, प्रदीप जोशी आदी मान्यवर जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL) मध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सने अटीतटीच्या सामन्यात रावेर…

Read More

​मुंबई क्रिकेट असोसिएशनचा दिमाखदार ‘अवॉर्ड्स नाईट’ सोहळा; विश्वविजेत्या खेळाडूंचा गौरव

​मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित ‘अवॉर्ड्स नाईट’ सोहळा नुकताच अत्यंत दिमाखात पार पडला. क्रिकेटच्या मैदानात अतुलनीय कामगिरी करून मुंबई आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या चॅम्पियन्सचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती…

Read More

जळगाव क्रिकेट लीगचा थरार: अमळनेर, रावेर आणि चाळीसगाव संघांचे जोरदार विजय

उपांत्य फेरीसाठी चुरस वाढली; साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यांकडे लक्ष जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL T-20) मध्ये आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. २१ आणि २२ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यांमध्ये अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स आणि…

Read More
Top
error: Content is protected !!