धुळे | वास्तव पोस्ट वृत्तसेवा
सहकार क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे राज्य नेते आणि संस्थापक इंजि. विजय हिलाल मंगळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली ‘पगारदार नोकरांच्या पतसंस्थेचे राज्य सहकारी फेडरेशन मर्यादित, धुळे’ या संस्थेची पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक (सन २०२६ ते २०३१) पूर्णपणे बिनविरोध होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ५ डिसेंबर २०१३ रोजी स्थापना झाल्यापासून आजतागायात इंजि. विजय मंगळे हेच या संस्थेचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत असून, त्यांच्यावरील विश्वास या निवडणुकीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
११ जागांसाठी आले फक्त ११च अर्ज!
या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण ११ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत (५ जून २०२६) नेमके ११ उमेदवारांचेच अर्ज दाखल झाले. दिनांक ८ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पार पडलेल्या छाननी प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी महेश गायकवाड यांनी सर्वच्या सर्व ११ उमेदवारांचे अर्ज कायदेशीररीत्या वैध ठरवले आहेत. वैध उमेदवारांची ही यादी ९ जून २०२६ रोजी संस्था व निवडणूक कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २३ जून २०२६ (दुपारी ३:०० वाजेपर्यंत) असली, तरी सर्व जागांवर प्रत्येकी एकच वैध अर्ज असल्याने आणि कोणामध्येही अंतर्गत स्पर्धा नसल्याने, ही निवडणूक केवळ औपचारिकता उरली असून सर्व ११ उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. केवळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
वैध ठरलेल्या ११ उमेदवारांची नावे व प्रवर्ग
अ) सर्वसाधारण मतदार संघ
१. देसले विजय वसंतराव
२. पाटील धनराज अभिमन
३. पाटील प्रमोद मधुकर
४. महल्ले ज्ञानेश्वर माधवराव
५. वाघ जगदिश मुरलीधर
६. शेवाळे संजय वामन
ब) अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग (१ जागा):
७. कोकणी गणेश चुनिलाल
क) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग (१ जागा):
८. गायकवाड गणेश ईश्वरलाल
ड) इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्ग (१ जागा):
९. वाघचौरे मनोज कारभारी
इ) महिला राखीव मतदार संघ (२ जागा):
१०. मोजे अश्विनी चुरकुटराव
११. शिंदे साधना त्र्यंबकराव
सहकार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
इंजि. विजय मंगळे यांच्या सक्षम व पारदर्शक कार्यपद्धतीमुळेच संस्थेने ही बिनविरोधची परंपरा राखली असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. या यशस्वी वाटचालीबद्दल आणि सर्व ११ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याबद्दल सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि हितचिंतकांकडून इंजि. विजयराव मंगळे व सर्व भावी संचालकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


फारच वास्तव बातमी स्वताहून दिली