मविआच्या एकतेची वज्रमूठ : पाचोर्यातील मेळाव्यात एकजुटीचा निर्धार
पाचोरा | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघाची जागा शिवसेना-उबाठा पक्षाला मिळाली असून महाविकास आघाडीच्या सर्व घटकपक्षांनी एकोप्याने काम करून विजय संपादन करण्याचा निर्धार केल्याचे पाचोरा येथील मेळाव्यातून अधोरेखीत झाले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रिंगणात राहणार असल्याने पक्षातर्फे ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे….
