Headlines

दिपक जाधव

जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी कल्पना चव्हाण यांची नियुक्ती

जळगाव | दि.१३ (वास्तव पोस्ट न्युज)– जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी चंद्रपूर येथील जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यापासून जळगाव माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी चार्ज नाशिक जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्याकडे होता.

Read More

कजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन संपन्न

कजगाव | दि.१३ (वास्तव पोस्ट न्यूज) दिपक अमृतकर | तालुका भडगाव येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सहकार्यातून व अनिल रघुनाथ महाजन यांच्या विशेष प्रयत्नातून अनिल महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित साधून प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन, उपसरपंच संभाजी पवार, माजी उपसरपंच शफी मणियार, मनोज धाडीवाल, मांगीलाल मोरे, दिनेश टेलर, धर्मराज हिरे,…

Read More

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे महिलांचा वाढता कल : वैशालीताई सुर्यवंशी

भडगाव | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आचारसंहिता लागण्याच्या आधी भडगाव तालुक्यातील उर्वरित गावांमध्ये शाखांचा शुभारंभ करण्याचा आमचा संकल्प असून मतदारसंघातून पुरूषांच्या सोबतीने महिलांचा सुध्दा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. त्या तालुक्यातील कजगाव-वाडे गटातील शिवसेना शाखांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या. या संदर्भातील वृत्त असे…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित दोन दिवसीय गांधी विचार दर्शन कार्यशाळा उत्साहात

जळगाव | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गांधी रिसर्च फाऊंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या दोन संस्थांनी सामंजस्य करारांतर्गत आयोजित केलेल्या दोन दिवसीय गांधी विचार दर्शन कार्यशाळा नुकतेच गांधीतीर्थ येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ४४ विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग होता. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी गांधीतीर्थ म्युझियमला तसेच जैन…

Read More

सांस्कृतिक कार्य संचालनालया मार्फत जळगांव येथे तमाशा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत नटवर कॉम्पलेक्स PVR सिनेमागृह शेजारी भरारी सभागृह जळगांव येथे दिनांक १२ मार्च ते ३१ मार्च, २०२४ या कालावधीत तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन होत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी दिली. तमाशा प्रशिक्षण शिबिराचे शिबिर संचालक म्हणून श्री शेषराव…

Read More

महसूल विभागातील पदनामे सन्मान वाढवणारी करावीत ; महसूल मंत्री विखे पाटील

मुंबई | दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यातील महसूल विभागातील काही पदांची पदनामे ही ब्रिटिशकालीन असून अशी पदनामे बदलून कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढवणारी पदनामे करावीत, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी राज्याचे महसूल मंत्री श्री. विखे पाटील…

Read More

वन विभागाकडून कारवाई ; देवझिरी वनक्षेत्रात झाडाची चोरी करणाऱ्यास एकास वन कोठडी

जळगाव | दि.११ (वास्तव पोस्ट न्यूज ) -देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणे मध्ये राखीव वनात राजेंद्र डोकाऱ्या पावरा राहणार मेलाणे हा अवैधरित्या साग वृक्ष २७ व इतर प्रजातीचे वृक्ष ३१ असे एकुण ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना सदर इसमा विरुध्द महिला वनरक्षक यांनी वनअपराध अन्वये वनगुन्हा नोंदविला आहे. अशी माहिती सहा. वनसंरक्षक (वनीकरण व…

Read More

बैलगाडी उलटल्याने १३ वर्षीय बालकाचा मृत्यू ; वाकडी येथील घटना

जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव तालुक्यातील म्हसावद येथून काही अंतरावर असलेल्या वाकडी या गावातील शेतकरी कुटुंबातील एक मूलगा शेतात बैलगाडी घेऊन जात असतांना बैलगाड़ी उलटल्याने अपघात होऊन त्यात सदर मुलाचा मृत्यु झाल्याने कुटुंबावर व गावावर शोककळा पसरली आहे. मृत गौरव हा म्हसावद येथील विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत होता. सविस्तर वृत्त…

Read More

नेत्र रुग्णांकरीता तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन ; गरजूंनी लाभ घेण्याचे आयोजकांकडून आवाहन

जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज )– कानळदा येथील तीर्थक्षेत्र महर्षी कण्व आश्रम येथे श्री स्वामी चंद्रकिरण सरस्वती यांच्या आर्शिवादाने व श्री स्वामी अव्दैतानंद चंद्रकिरण सरस्वती यांच्या पुढाकाराने कानळदा व परिसरातील नेत्र रूग्णांच्या सेवेकरिता भव्य शिबीराचे आयोजन गुरूवार, दि.१४ ला सकाळी ८.३० ते १.३० वाजेपर्यंत तीर्थक्षेत्र महर्षी कण्व आश्रम कानळदा येथे करण्यात आले आहे….

Read More

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात जळगाव जिल्ह्याचा ठस्सा

जळगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती करण्यात आली असून या माध्यमातून जळगाव जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणात शिक्षक मिळाले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीपत्र देताना मनस्वी आनंद होत असून उपलब्ध झालेल्या शिक्षकांच्या माध्यमातून भविष्यकाळात जळगाव जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढ करण्यास नक्कीच मदत…

Read More

रीतू मंडोरे ला सुवर्णपदक

जळगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जैन इरिगेशनचे सहकारी प्रविण मंडोरी यांची कन्या व एस.एस. मणीयार लॉ कॉलेजमधील दुसऱ्या वर्षाला असलेली रीतू मंडोरे हिला सुवर्ण पदक मिळाले. क. वि. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये झालेल्या पदवीदान समारंभात ॲड प्रभाकर राणे यांच्या स्मरणार्थ सुवर्णपदक देऊन रितू मंडोरे हिला डॉ. पंकज मित्तल, डॉ. विजय माहेश्वरी…

Read More

भडगावात रंगली कुस्त्यांची दंगल ; नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते आखाडा पूजन

भडगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील सोमेश्‍वर महादेव मंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांची दंगल चांगलीच रंगली. याला पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या संदर्भातील माहिती अशी की, महाशिवरात्रीचे औचित्य साधून परंपरेनुसार शहरातील सोमेश्‍वर मंदिर महाशिवरात्री यात्रोत्सव पंच मंडळाच्या विद्यमाने कुस्त्यांची दंगल आयोजीत करण्यात आली. निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक नरेंद्रसिंगदादा…

Read More

दिव्यांगांना मदत करणारा वर्दीतला देव माणूस ; माणसातील देवत्वाचा सन्मान

मुंबई | दि. ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज आपण २१ व्या शतकात वावरत आहोत. २१ वे शतक हे विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे आहे. असे असले तरी हे शतक फारच धावपळीचे असल्याचे आपणाला दैनंदिन जीवनात जाणवते. आजच्या धकाधकीच्या जीवनात सामान्य जणांना स्वतःकडे व स्वतःच्या कुटुंबाकडे देखील व्यवस्थित लक्ष देता येत नाही. अशात समाजसेवा करणे हे…

Read More

दूध उत्पादक सोसायटीच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार

पाचोरा | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील बाळद बुद्रुक येथील दुग्ध उत्पादक सोसायटीचे नवनियुक्त चेअरमन तसेच व्हाईस चेअरमन यांचा सत्कार शिवसेना-उबाठा नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आला. बाळद बुद्रुक सहकारी दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी नुकतीच अरुण सोमवंशी तर व्हाईस चेअरमनपदी शालीक जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड…

Read More

‘ग्लॅम अँड ब्युटी स्पा’ चे वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते उदघाटन

भडगाव | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अतिशय अद्ययावत सुविधांनी युक्त असणार्‍या ‘ग्लॅम अँड ब्युटी स्पा’ या ब्युटी शॉपीचे उद्घटान शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते जागतिक महिला दिनी खास महिलांसाठी असणार्‍या आदिती ‘ग्लॅम अँड ब्युटी स्पा’…

Read More
Top
error: Content is protected !!