Headlines
Home » शैक्षणिक » जानेवारी २०२४ महाराष्ट्र टॅलेंट सर्च परिक्षेत स्वराज वाणी केंद्रात प्रथम

जानेवारी २०२४ महाराष्ट्र टॅलेंट सर्च परिक्षेत स्वराज वाणी केंद्रात प्रथम

कजगाव | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जानेवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परिक्षेचा निकाल घोषित झाला असून या परिक्षेमध्ये शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कजगाव, या विद्यालयाचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी स्वराज आशिष वाणी याने २०० पैकी १३८ गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले.

या परिक्षेसाठी भडगाव हे परिक्षा केंद्र होते. स्वराज हा भडगाव येथील परीक्षा केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशाबद्दल लाडशाखीय वाणी समाज कजगाव तसेच परिसरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!