Headlines
Home » राजकीय » राजकीय धुराळा: तीन जागा सोडण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध; काय राज ठाकरे यांच्या हाती शिंदे सेना जाणार ?

राजकीय धुराळा: तीन जागा सोडण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध; काय राज ठाकरे यांच्या हाती शिंदे सेना जाणार ?

मुंबई | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – चार दिवसांपूर्वी दिल्ली येथे अमित शाहा यांच्यासोबत बैठक नंतर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस सोबत मुंबईत हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये केंद्र व राज्याच्या नेतृत्वासोबत ही चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा द्यायच्या इतक्यापुरतीच ही चर्चा मर्यादित नाही. राज यांना महायुतीसोबत कसं आणता येईल, त्यांना दीर्घकाळासाठी सोबत कसं ठेवता येईल या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. भाजपने राज ठाकरेंसमोर काही पर्याय ठेवले असल्याची माहीती समोर आली आहे. त्यात मनसेचं शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण करून शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरे यांच्याकडे देण्यात येणार असल्याची बातमी आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाटेच्या तीन जागा मनसेस सोडण्यास नकार दिला आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदेंच्या हाती दिली आता हीच शिवसेना एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरे यांच्या हातात देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांनी लगेच होकार किंवा नकार न देता दुसरे प्रस्ताव आहेत त्यावर आधी विचार करणार असल्याचं सांगितले. तर उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की हा बाजारबुडगेपणा आहे, यामुळे काहीही फरक पडणार नाही.

या प्रस्तावामुळे काही प्रश्न निर्माण होतात त्यात म्हणजे जर का मनसेचं शिवसेनेत विलीनिकरण झालंच तर शिंदे गटाच काय होणार ? बाळासाहेबांना सोडून राज ठाकरे यांनी मनसे पक्ष सुरू केला होता ,आणि आता १८ वर्षांपासूनच्या असलेल्या मनसेच्या विलीनीकरणाचा मोठा निर्णय राज ठाकरे घेतील का ? तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या गटाला राज ठाकरेंचं नेतृत्व मान्य होईल का ? ४० खासदार आणि १३ आमदार सध्या शिंदे गटाकडे आहेत. विलीनीकरणा नंतर राज ठाकरे यांना कोणते अधिकार असतील, एकनाथ शिंदेंच काय, त्यांनाही काही अधिकार असतील का ? असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ही एक चर्चा आहे की नुसताच राजकीय धुराळा आहे, का त्यात काही तथ्य आहे, हे येणारा काळच सांगेल. दुसऱ्या पर्यायात मनसेने महायुतीत यावे, त्यांनी लोकसभेच्या दोन ते तीन जागेवर आपले उमेदवार उभे करावे. तिसऱ्या पर्यायात लोकसभेला जागा न देता विधासभेसाठी जास्त जागा देऊ मात्र लोकसभेसाठी मनसे ने महायुतीसाठी प्रचार करावा.

याविषयी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, असं काही कोणाचा पक्ष कोणाकडे जात नाही, मी काही शिवसेनेचा प्रवक्ता नाही किंवा राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही, त्यामुळे ह्या प्रश्नाच उत्तर मला विचारू नका मी एवढंच सांगू शकतो की मात्र राज ठाकरे यांनी महायुतीत यावं अशी चर्चा आमच्यात सुरू आहे.

शेवटी हे राजकारण आहे, इथे सत्तेसाठी काहीही होऊ शकते हे आपण बघितले आहे. सत्ता जर मिळत असेल तर कोणाला नको आहे, असे सूर सामान्य जनतेतुन येत आहेत. मात्र राज ठाकरे आपला पक्ष विलीन करता असे वाटतं नाही असंही काहींच म्हनणे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!