ओरियन सीबीएसई स्कूल मध्ये संविधान दिन साजरा
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधान दिनानिमित्त स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व विद्यार्थ्यांना संविधानाची विस्तृत माहिती दिली. संविधान उद्देशिकेतील मूलभूत हक्क, कर्तव्य…
