जळगाव
स्वीप उपक्रम सत्कार समारंभात मु जे महाविद्यालया च्या रेडिओ मनभावनला गौरविले
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात SVEEP उपक्रमांतर्गत माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हा नियोजन सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे प्राचार्य संजय भारंबे याना सन्मानित करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत वाढलेला प्रतिसाद याकरिता विविध माध्यमानी जनजागृती करण्यात आली होती. केसीई सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या रेडिओ…
राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त शरीरशुद्धी शिबिर संपन्न ; सोहम योग अँड नॅचरोपॅथी विभागाचा उपक्रम
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सातव्या राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त मू. जे.(स्वायत्त ) महाविद्यालयाच्या सोहम योग – निसर्गोपचार विभागाद्वारे द्वारे मू. जे. महाविद्यालय परिसरात तीन दिवसीय शरीरशुद्धी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय बॉडी डिटॉक्स कॅम्प चे आयोजन निसर्गोपचार केंद्राचे समन्वयक व योग -निसर्गोपचार तज्ञ प्रा. अनंत महाजन आणि प्रा. सोनल महाजन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले…
अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराने बजावला मतदानाचा हक्क
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अभेद्य जैन, अभंग जैन या सह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाचा हक्क बजावला. ‘स्वतः केले मग सांगितले…’ या उक्तीप्रमाणे मतदानाचे महत्व पटवून देणे, नागरिकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जैन परिवाराने सकाळी ७ वाजून ०५…
कांताई नेत्रालयाचा उपक्रम ; मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातील निमखेडी रोड व प्रतापनगर येथील कांताई नेत्रालयातर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी २१ नोव्हेंबर रोजी विनामूल्य नेत्र तपासणी केली जाणार आहे. जे मतदार मतदान केल्याची डाव्या हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखवतील, त्यांना नेत्र तपासणीत शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. ही सवलत दि. २१ नोव्हेंबर २०२४ पुरतीच मर्यादीत असेल. सामाजिक…
ओरीअन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे ‘अखंड ध्यान ज्योत बैठक’ चे आयोजन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे ‘तेज ज्ञान फाउंडेशन’ च्या रौप्य महोत्सवानिमित्त अखंड ध्यान ज्योत धारणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेतील सर्वच शिक्षकांनी यात आपला सहभाग नोंदवला. दैनंदिन जीवनात ध्यान धारणेचं महत्व काय असतं हे या निमित्ताने समजले. आज दि.१८ रोजी सकाळी १०.१० वाजेपासून तर…
कुलभूषण पाटील यांच्या सभेस नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद ; मताधिक्याने निवडून आणू : शहरातील नागरिकांची ग्वाही
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा निवडणूकीच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार असून दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान तर दि.२३ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित होणार आहेत. जळगाव शहरात यावेळी चौरंगी लढत होत असुन पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने बंड करून अपक्ष म्हणून लढत असलेले उमेदवार देखील दावेदार ठरू पहात आहेत. जळगाव शहर मतदार संघात माजी उपमहापौर कुलभूषण…
‘एपिक’ फोटो प्रदर्शनाची सुरवात ; दृष्य कथा, बोलक्या गोष्टींसह चित्रांचा संग्रह जळगावकरांसाठी प्रेरणादायी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनमधील सहकारी जगदीश चावला व तुषार बुंदे यांच्या इपिक फोटो प्रदर्शन पु.ना. गाडगीळ आर्ट गॅलरीमध्ये आज दि. १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत आयोजीत केले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन फीत सोडून व दीपप्रज्वलनाद्वारे झाले. याप्रसंगी शकुंतला चावला, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे नितीन चोपडा, तुषार…
‘विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र’ ; ओरियन स्टेट बोर्ड शाळेचा निवडणूक जनजागृतीसाठी उपक्रम
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदान टक्केवारी वाढण्यासाठी जळगाव शहर विधानसभा मतदार संघात स्वीप नोडल अधिकारी तथा मनपा सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, अभियंता प्रकाश पाटील, योगेश बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली दि.८ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. आज दि.१३…
रेडियो मनभावन 90.8 एफ.एम कडून विद्यार्थ्यांसाठी रेडियो जॉकी सप्ताहाचे आयोजन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : बालदिनाचे औचित्य साधून खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालयात रेडियो मनभावन 90.8 एफ.एम ने लहान विद्यार्थी मित्रांचा रेडियो जॉकी सप्ताह सुरू केला आहे. दि.१४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत सदर सप्ताह साजरा होणार आहे. यात विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि पर्यावरण यावर संवाद साधायचा आहे. बालदिनी…
डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात व्यसनमुक्ती आणि मतदान जनजागृती वर कार्यक्रम
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांसाठी जळगाव विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत ड्रग अब्युज या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी समांतर विधी सहाय्यक तसेच काउन्सलर भारती ज्ञानेश्वर कुमावत आणि ॲडवोकेट ऐश्वर्या मंत्री हजर होते. भारती कुमावत यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती संबंधी मार्गदर्शन केले. व्यसनाचे वेगवेगळे प्रकार यावर प्रकाश टाकून…
जळगावकर पुन्हा हादरले ; दादावाडीजवळ उड्डान पुलावर ॲम्बूलन्समध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट !
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : इच्छादेवी चौकात महामार्गाला लागून असलेल्या एका दुकानात दहा दिवसांपूर्वी ओमनी गाडीत अवैधपणे घरगुती गॅस भरताना गाडीने पेट घेऊन झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातले सात आणि इतर तीन असे दहा जण गंभीर भाजले गेल्याची घटना ताजी असतांनाच रात्री एरंडोलहून जळगाव शहराच्या दिशेने येणाऱ्या रुग्णवाहिकेमधील ऑक्सीजन सिलेंडरच्या झालेल्या स्फोटाने जळगावकर पुन्हा एकदा…
संत नामदेव महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५४ व्या जयंतीचा कार्यक्रम आज भाजप कार्यालय वसंत स्मृती जळगाव येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. याप्रसंगी त्यांनी संत नामदेव महाराजांच्या वारकरी संप्रदायाच्या महान कार्याबाबत…
विधानसभा निवडणूक २०२४ : मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात डिजिटल चित्ररथास प्रारंभ
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्यात मतदान होणार आहे. त्याकरिता केंद्रीय संचार ब्यूरो विभागीय कार्यालय, पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यात दि.११ पासून ते २० नोव्हेंबर पर्यंत डिजिटल चित्ररथ मार्फत मतदार जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या प्रागंणात मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांच्या हस्ते करण्यात…
शोषणमुक्त सशक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य : डॉ. अनिल काकोडकर
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शोषणमुक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य आहे. कारण गांधी विचारधारेत अंत्योदयाचा विचार आहे. समाजातील वंचित, शोषीत व पीडित घटकांचा विचार आहे. ग्राम स्वराज सोबत सर्वांच्या सक्षमीकरणाचा विचार आहे. सध्याच्या ज्ञानयुगात प्रत्येकाच्या मनातील विश्वस्ताची भावना विकसित होण्यास पुरेसा वाव आहे, असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा अणुऊर्जा आयोगाचे…
इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकरीता आज दि.९ रोजी शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले. आजच्या या सभेस विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. नुकतेच कॉलेज सुरु होऊन अभ्यासक्रमावर प्रथम घटक चाचणी घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रत्येक विषयाचे पेपर दाखवून मिळालेल्या गुणाचे व…
