Headlines
Home » जळगाव » Page 18

जैन इरिगेशनच्या चौघं कॅरम पटूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने गौरव

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय कॅरम पटू संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर, योगेश धोंगडे तसेच आंतरराष्ट्रीय महिला कॅरमपटू नीलम घोडके यांचा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुणे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा शानदार पुरस्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

जैन इरिगेशनचा आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास श्री शिव छत्रपती पुरस्कार घोषित

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील जैन इरिगेशन ह्या मानांकित कंपनीचा आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास सन २०२३–२४ करिता खेळाडू म्हणून “श्री. शिव छत्रपती पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.योगेश धोंगडे याची गेल्या ५ वर्षातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरिल उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे महाराष्ट्र राज्य सरकारने कालच ह्या पुरस्कारांची घोषणा केली. योगेश धोंगडे यांच्या…

Read More

उत्तम आरोग्यासाठी आहारात केळीचे प्रमाण वाढवा : डॉ. के. बी. पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जागतिक केळी उत्पादनाच्या ३० टक्के केळी आपल्या भारतात उत्पादन होते. मात्र तिचे सेवन भारतीयांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. सर्वांगिण दृष्टीने विचार केला असता केळी हे पौष्टीक फळ आहे त्याचे दैनंदिन जीवनशैलीच्या आहारात समावेश केल्यास उत्तम आरोग्य राहिल त्यासाठी दररोज ‘दोन केळी खा आणि निरोगी रहा’ हा आरोग्याचा मंत्र…

Read More

जिल्ह्यातील उद्योगांसाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद संपन्न ; जिल्ह्यात १६३६ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : उद्योग सुलभतेसाठी २१ कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक ‘उद्योग भवन’ उभारले जात असून, कुसुंबा व चिंचोली येथे २८५ हेक्टर जागेचे भूसंपादन करून नवीन MIDC विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असून  जागा उपलब्धते बाबत  जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात प्लास्टिक उद्योगांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘प्लास्टिक औद्योगिक समूहा’ साठी उद्योजकांनी यासाठी सहकार्य…

Read More

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात तालुकास्तरावर अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूल प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत खासगी संस्था गटामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत तालुकास्तरावर अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल ला प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील पारतोषिक वितरण समारंभ जिल्हा नियोजन भवन येथे पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते…

Read More

जळगाव व चोपड्याला नवे बसतळ मंजुरीसाठी प्रयत्नशील ; लालपरीच्या नव्या पर्वाची सुरुवात.

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “लालपरी म्हणजे फक्त प्रवास नाही, ती लाखो कुटुंबांच्या जीवनाशी जोडलेली आशेची दोरी आहे. आईच्या पदरा इतकाच विश्वास देणारी ही सेवा आता नव्या रूपात जनतेसमोर येतेय,” जळगाव व चोपडा येथे आधुनिक बसतळ मंजुरीसाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते आज जळगाव येथे पाच नव्या एस.टी. बसच्या लोकार्पण…

Read More

धार्मिक-सामाजिक एकतेचा उत्सव बोरगावात साजरा ; पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

तीन दिवसांच्या भागवत सप्ताहाने गावात भक्तिरसाची उधळण : धरणगाव ( वास्तव पोस्ट ): बोरगाव बु. येथील मध्यवर्ती श्री मारोती मंदिर परिसरात २० लाखांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य सामाजिक सभागृहाचे लोकार्पण व श्री मारोती रायांची प्राणप्रतिष्ठा पालकमंत्री व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते व विधिवत पूजाविधीने संपन्न झाली. या शुभप्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव…

Read More

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात बीएएलएलबी आणि एलएलबी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ घेण्यात आला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड. प्रमोद पाटील, सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले हे लाभले होते. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. विजेता सिंग होते. यावेळी नुकतेच…

Read More

नवकार महामंत्राचा जप : जळगावातून ८१ हजार जणांची विश्वशांतीसाठी प्रार्थना

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘एक मन, एक व्यक्ती, एक चेतनेतून नवकार मंत्राची अनुभूती ही अध्यात्मिक शक्तीची प्रचिती आहे. विश्व नवकार दिना निमित्त पाणी बचत, वृक्षारोपण, स्वच्छता, स्वदेशी वस्तूंचा वापर, भारत दर्शन, सेंद्रीय शेती, हेल्दी लाईफ स्टाईल, योग व खेल कूद आणि गरिबांसाठी सहाय्य या नऊ संकल्पातून मानवतेसह सृष्टीचे संवर्धन करूया.!’ असा मोलाचा संदेश…

Read More

जळगाव सामाजिक न्याय विभाग कार्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

महानगरासाठी वसतीगृहांची संख्या वाढविण्याचे निर्देश जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत उत्तम सोयी-सुविधांनी युक्त वसतीगृहे उभारण्यात आलेली आहेत. मात्र, जळगावसारख्या मोठ्या शहरात वसतीगृहांसाठी प्रवेश मागणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने, नव्या वसतीगृहांची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी नवीन प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिले. नियोजन भवन,…

Read More

विश्व नवकार दिवसा निम्मित सर्व धर्मीय बंधू भगिनींची जाहिर प्रार्थनेचे आयोजन

एकाच वेळी १०८ देशांसह भारतात ६००० ठिकाणी नवकार महामंत्राचा जप जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगावकरांसाठी एक ऐतिहासिक आणि मंगलमय संधी येत्या ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक ८:०१ वाजता, खान्देश सेंट्रल ग्राउंड येथे विश्व नवकार महासंमेलन दिन आयोजित केला आहे. या पवित्र आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व धर्मीय बंधू-भगिनींना JITO जळगावच्या वतीने…

Read More

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास सुरवात झाली. दि १० एप्रिल रोजी जन्मकल्याणक असून त्या महोत्सव पर्वाचा आज पहिला दिवस होता. सुश्रावक आणी सुश्राविकांसह श्रद्धाळुंमध्ये उत्साह पाहण्यास मिळाला. आज सकाळी सामुदायिक सामायिक या साप्ताहिक गतिविधीमध्ये ‘ए कन्फर्म टिकट टू मोक्ष’ हा  प्रबोधनात्मक कार्यक्रम नमन-निपूण डागा यांनी सादर केला….

Read More

जळगाव शहरातील परीक्षा केंद्रावर ४७३ विद्यार्थ्यांनी दिली AISSEE-2025 परीक्षा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा देशभरात महत्त्वपूर्ण परीक्षांचे आयोजन केले जाते . यांच्यामार्फतच देशभरात सर्व महत्वपूर्ण प्रवेश परीक्षा  पार पाडण्यासाठी विविध स्तरावर पदाधिकाऱ्यांची  सोबतच परीक्षा कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते. के.सी.ई. सोसायटी संचलित ओरीयन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची सिटी कॉर्डिनेटर म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा ऑल इंडिया…

Read More

अनुभूती बालनिकेतनच्या समर कॅम्पची उद्यापासून सुरवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती बालनिकेतनमध्ये  ७ ते २१ एप्रिल दरम्यान ३ ते ७ वर्षे वयाच्या मुलांसाठी एक अभिनव समर कॅम्प आयोजित केला आहे. या कॅम्पमध्ये ३५ मुलांनी सहभाग घेतला आहे. मुलांच्या सर्वांगीण आणि शालेय बाह्य कौशल्य विकसित करण्यासाठी विविध क्रियाकलाप या वैशिष्ट्यपूर्ण समर कॅम्पमध्ये घेण्यात येणार आहेत. मुलं विज्ञान, गणित, नृत्य, नाटक…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने समता पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे. हा उपक्रम ०१ एप्रिल २०२५ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत ‘समता पंधरवडा’ म्हणून राबविण्यात येत आहे. समता पंधरवडा अंतर्गत, सन…

Read More
error: Content is protected !!