Headlines

दिपक जाधव

प्रा.उमेश ठाकरे यांच्या हस्ते भूगोल मंडळाचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भूगोल दिनाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी प्राध्यापक उमेश ठाकरे स्वामी विवेकानंद विद्यालय (स्वायत्त्य) जळगाव यांच्या हस्ते भूगोल मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. ठाकरे यांनी भूगोल दिनाचे महत्त्व, भौगोलिक माहिती त्याचबरोबर सूर्याचे भासमान भ्रमण इत्यादी विषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी होते. त्यांनी भूगोलाचा इतर विषयाशी कसा…

Read More

‘आत्मनिर्भर युवती अभियान’ कार्यशाळेत तज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : दि.२२ जानेवारी २०२५ ते २८ जानेवारी २०२५ दरम्यान केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगांव येथे आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील युवतींना योगासन, प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात आले व विविध विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ.विजेता सिंग प्राध्यापक मणियार विधी महाविद्यालय जळगांव यांनी…

Read More

गणिताची भीती दूर करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन गरजेचे : डॉ.चंद्रमौली जोशी

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : गणित हा विषय अतिशय सोपा असून या विषयांमध्ये शंभर टक्के गुण मिळवता येऊ शकतात फक्त गरज आहे ती समजून घेण्याची व समजण्याची तयारी असली पाहिजे. खेळा खेळातून गणित शिकले पाहिजे. दैनंदिन व्यवहारांमध्ये गणिताशिवाय कोणतेही संभाषण अथवा व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. कळत न…

Read More

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : शेतकऱ्यांच्या ओळखपत्रामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभता मिळेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व सक्षमता वाढणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दृष्टीने ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांचे ओळखपत्र हे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा…

Read More

पुस्तकांशी मैत्री करा : नाट्यकलावंत हर्षल पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वाचन ही माणूस समृद्ध करणारी अतिशय महत्वाची बाब आहे. आपले व्यक्तित्व विकसित होण्यासाठी ललित आणि वैचारिक अशा दोन्ही पद्धतीच्या चांगल्या पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. असे मत नाट्यकलावंत हर्षल पाटील यांनी व्यक्त केले. मूळजी जेठा (स्वायत्त), महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित ‘काय वाचावं? का वाचावं? या…

Read More

क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये रुचिका वसंत सोनवणे ची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुल व्दारा के.सी. ई. सोसायटीच्या विद्यार्थ्यांकरीता के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन २१ ते २४ जानेवारी २०२५ दरम्यान करण्यात आले होते. यात शालेय प्राथमिक गट इयत्ता पहिली ते चौथी या गटात गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक शाळेची खेळाडू विद्यार्थिनी रुचिका वसंत सोनवणे…

Read More

भडगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा…

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव येथील जिल्हा परिषद वस्ती शाळा या ठिकाणी प्रजासत्ताक २६ जानेवारी रोजी या शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भानुदास महाजन यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. तसेच दलित आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, मिठाई…

Read More

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकदेवळा येथे समिती सदस्य बापु पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

जळगाव ( जळगाव ) : भारताचे ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह संविधानाचे व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय शिक्षण समिती सदस्य युवा नेते बापु पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच पती सुदाम वाघ,…

Read More

जैन स्पोर्टस् अकॅडमी चा राष्ट्रीय खेळाडू पुष्पक महाजन जिल्हा क्रीडा “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव, यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना “गुणवंत खेळाडू” पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक रमेश महाजन याला तायक्वांडो या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय…

Read More

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पोलीस कवायत मैदानावर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येत्या काळात जिल्हा आरोग्य सेवेचे केंद्र बनणार असून जळगाव शहराच्या जवळ चिंचोली येथे सर्व सुविंधायुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ६५० खाटांचे रुग्णालय लवकरच सुरु होणार असून सिंचनाच्या दृष्टीनेही जिल्ह्यातील ८ प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर १ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भारताच्या…

Read More

तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय : पालक मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीच व जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन. “गावाची एकजूट म्हणजे विकासाचा पाया आहे. आपण सगळ्यांनी मिळून आपले गाव आणि जिल्हा प्रगतिपथावर नेऊ या. मी तुमच्यातीलच एक असून तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आव्हाणे येथे आयोजित नागरी…

Read More

भारतीय डाक विभागात विमा प्रतिनिधी पदाची भरती; ०५ फेब्रुवारी रोजी होणार मुलाखत

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विना योजनांच्या विक्रीसाठी अधीक्षक डाकघर जळगाव विभाग जळगाव -४२५००१ यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधींची नेमणूक निवड करण्यात येणार आहे. उमेदवाराचे वय वय १८ वर्षे पूर्ण असावे. उमेदवार १० वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा….

Read More

के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव २०२५ चा समारोप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि२१ जानेवारी ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुल आयोजित “के.सी.ई.एस.क्रीडा महोत्सव २०२५” च्या समारोप प्रसंगी क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, के. सी. ई. सोसायटीचे सचिव ॲड. प्रमोद पाटील व सहसचिव ॲड. प्रविणचंद्र…

Read More

उच्च शिक्षणात नवीन बदलांची नांदी ठरेल यूजीसी मसुदा – २०२५

अमळनेर ( वास्तव पोस्ट ) : “उच्च शिक्षणामध्ये काळाशी सुसंगत असे बदल होणे गरजेचे आहे. याचाच भाग म्हणून सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० लागू केले आहे. या धोरणाला पूरक असे काही महत्वाचे बदल व्हावेत यासाठी नुकताच ‘यूजीसी मसुदा -२०२५’ प्रस्तावित करण्यात आला आहे. विविध तज्ञ मंडळीच्या गहन चिंतनमंथनातून या मसुद्यात नवीन बाबी समाविष्ट करण्यात आल्या…

Read More

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाला मतदान जनजागृतीचे गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जिल्हा आयकॉन मदन लाठी यांनी मतदानाचे महत्व सांगून आणि त्यात विशेषतः युवा पिढीने पुढे येऊन मत देऊन सहभाग नोंदवण्यास सांगितले. राष्ट्रीय मतदार दिवस…

Read More
error: Content is protected !!