Headlines

दिपक जाधव

विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनातून यशाचा मंत्र आत्मसात करावा : मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विज्ञान प्रदर्शन हा केवळ स्पर्धा नाही, तर तो आपल्या प्रयोगशीलतेला नवे आयाम देणारा एक मंच आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेस चालना देण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रयोगशील विचारसरणी अंगी कारावी, जे जमते त्यावर अधिक भर द्यावा. विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास…

Read More

मूळजी जेठा महविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘चैतन्य -२०२५’ तरुणाईच्या जल्लोषात संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महविद्यालयामध्ये दि.१७ आणि १८ जानेवारीला चैतन्य- २०२५ वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनात दोन दिवस विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा आविष्कार पहावयास मिळाला. या कार्यक्रमाच्या समारोपावेळी जळगावच्या उप जिल्हाधिकारी अर्चना मोरे आणि जळगावचे अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते उपस्थित होते. समारोपावेळी अर्चना मोरे विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हटल्या की,…

Read More

केळी क्लस्टरच्या अंमलबजावणी नियोजनासाठी जैन हिल्स येथे ‘केळी पीक चर्चासत्र’

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्या ३० वर्षामध्ये जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी टिश्युकल्चर, ठिबक सिंचन, फर्टिगेशन व हायटेक पॅकेज ऑफ प्रॅक्टीसेस, फ्रुट केअर मॅनेजमेंट, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आणि निर्यात या क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून केळी पीक क्लस्टर योजनेमुळे जळगाव जिल्हा हे केळी निर्यातीचे हब म्हणून जगाच्या बाजारपेठेत नावलौकीक मिळवेल.निर्यातीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे…

Read More

इनरव्हील क्लब जळगावची वृद्धाश्रमास भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘इनरव्हील डे’ निमित्त वृद्धाश्रमामधील आजी-आजोबांशी संवाद साधून त्यांच्यासोबत वेळ घालविता यावा यासाठी इनरव्हील क्लब जळगावचे अध्यक्ष उषा जैन यांच्यासह सदस्यांनी सावखेडा शिवारातील मातोश्री आनंदा आश्रमाला भेट दिली. सचिव निशिता रंगलानी, सीसी रंजन शाह, प्रोजेक्ट चेअरमन नूतन कक्कड व क्लब सदस्यांची उपस्थिती होती. नुतन कक्कड यांनी भोजनाची व्यवस्था करुन दिली….

Read More

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन ; वाहतुकीचे नियम पाळा, व्यसनांपासून दूर रहा : डॉ.महेश्वर रेड्डी

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, व्यासपीठावर डावीकडून विराज कावडिया, अशोक नखाते, संदीपकुमार गावित, सी.एस.नाईक जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विद्यार्थ्यांनी सिगारेट व इतर व्यसनांपासून दूर राहावे, वाहतुकीचे नियम पाळावेत, आणि पोलिस दलात करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आयोजित शस्त्र,…

Read More

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पोलीस स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, दि.१७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:४५ ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत शहरातील पोलीस स्केटिंग ग्राऊंड, पोलीस मुख्यालय, नवीन बस स्टॅन्ड समोर, जळगाव येथे शस्त्र, श्वानपथक, पोलीस बँड, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वायरलेस यंत्रणा यांचे प्रदर्शन जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व…

Read More

वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ : विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषांमुळे मू.जे. महाविद्यालय झाले बॉलीवूडमय

पुष्पा आणि श्रीवल्ली जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महविद्यालयामध्ये चैतन्य २०२५ वार्षिक स्नेहसंमेलना अंतर्गत आज विद्यार्थ्यांनी बॉलीवूड मधील विविध पात्रांची वेशभूषा करून महाविद्यालयामध्ये नवचैतन्य निर्माण केले. जुन्या आणि नव्या चित्रपटामधील विविध नायक-नायिका, खलनायक आणि विनोदी पात्रांची वेशभूषा करून विद्यार्थी महाविद्यालयात आले होते. यावेळी महाविद्यालयात बॉलीवूड थीम वर आधारित स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात…

Read More

वावडदे महावितरण उपकेंद्रास सहव्यवस्थापकीय संचालक यांची भेट

वावडदे ( वास्तव पोस्ट ) : जळगाव तालुक्यातील वावडदे येथे महावितरणाच्या सब स्टेशन येथे आज बुधवार दि.१५ जानेवारी रोजी सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे IAS यांनी मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी जळगाव झोन व अधीक्षक अभियंता अनिल महाजन जळगाव, तसेच वावडदा कक्ष कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता आकाश सोनवणे यांनी भेट दिली. या भेटीत वावडदा विभाग प्रधानमंत्री किसान ऊर्जा…

Read More

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया तर्फे स्व.खाशाबा जाधव जयंती व राज्य क्रीडा दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शारीरिक…

Read More

झांबरे विद्यालयात कातळ शिल्पावर व्याख्यान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात कातळ शिल्प या गुढ आणि रहस्यमय शिल्पा बद्दल राजापूरचे संशोधक आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए.के. मराठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये असलेल्या जांभ्या दगडाच्या कातळावर सुमारे दहा ते पंधरा हजार वर्षांपूर्वी माणसाने दगडी हत्यारांच्या सहाय्याने विविध प्राणी पक्षी मनुष्याकृती अशी असंख्य चित्रे…

Read More

पी.जी. महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त साडी डे साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के. सी. ई च्या पी.जी. महाविद्यालयाच्या ‘रिदम2025’ स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने साडी डे साजरा करण्यात आला. सकाळपासून महाविद्यालयातील परिसर हा विद्यार्थ्यांच्या उत्साहाने भरला होता. विद्यार्थिनींनी विविध पारंपरिक, पैठणी, नऊवारी, सहावारी साड्यांचा पेहराव करून लक्ष वेधले. तसेच विविध क्स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दि.१५ बुधवार रोजी सकाळी १० वाजता स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे….

Read More

IMR येथे बौद्धिक संपदा हक्क या विषयावर सेमिनार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव येथे बौद्धिक संपदा हक्क (IPR) या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.भूषण चौधरी, स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसचे संचालक आणि केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख होते. याप्रसंगी केसीईएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे संचालक प्रा.बी.व्ही. पवार, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्सच्या…

Read More

दोन सुवर्ण पदकं व प्रशस्तीपत्र देऊन शेतकरी कन्येचा राज्यपालांच्या हस्ते गौरव !

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : मनी जिद्द असली म्हणजे ठरविलेल्या ध्येया पर्यंत पोहचणे शक्य असते, शिक्षणाची जिद्द मनी घेत कजगाव येथील एका शेतकऱ्याच्या कन्येने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत दोन सुवर्णपदक पटकावणाऱ्या ऋतुजा चौधरी या शेतकरी कन्येस राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. भडगाव तालुक्यातील कजगाव येथील शेतकरी भिमराव…

Read More

राष्ट्रीय योग परिषदेत ‘डिजिटल युगामध्ये सर्वांगीण स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व’ या विषयावर चर्चासत्र

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित एम.जे. कॉलेजच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीच्या वतीने “डिजिटल युगात सर्वांगीण स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व” या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्याशाखीय परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली. परिषदेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सं.ना. भारंबे, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ.अरुण खोडस्कर अमरावती, प्राचार्य…

Read More

विवेकानंदांचा कर्मयोग जीवनात आणण्यासाठी एकाग्रता, चिकित्सक वृत्ती जोपासावी : डॉ. उदय कुमठेकर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित आनंदयात्री अण्णासाहेब डॉ. जी.डी. बेंडाळे स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. उदय कुमठेकर (नांदेड) यांनी ‘स्वामी विवेकानंदांच्या विचारांची समकालातील उपयुक्तता’ या विषयावर प्रतिपादन करताना ऋषी, आचार्य, संत व प्रबोधनकार या चार भारतीय…

Read More
Top
error: Content is protected !!