के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात पालक सभा उत्साहात संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्ष अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल व मेकनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेस विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला. यावेळी चालू शैक्षणिक सत्रात झालेल्या अभ्यासक्रमावर घेण्यात आलेल्या घटक चाचणीत विद्यार्थ्यांनी लिहिलेले पेपर व त्यांनी संपादन…
