SANDIP RANDHE

‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’ चा ‘जागतिक कृषी पुरस्कार-२०२४’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जागतिक कृषी पुरस्कार-२०२४’ ने सन्मानित करण्यात आले. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज मिळालेल्या या जागतिक कृषी पुरस्कारामुळे राज्याच्या शाश्वत शेतीच्या…

Read More

आरआरपी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

ठाणे ( वास्तव पोस्ट ) : एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्प OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Testing) उभा करण्याची क्रांती करतो, याचा मला अभिमान आहे. हे शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करीत असून यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापे एमआयडीसी येथे केले. ठाणे जिल्हातील महापे एमआयडीसी येथे मे.आर.आर.पी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स…

Read More

मालेगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : मालेगाव शहरातील कॅम्प भागात आज १०० खाटांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. या रुग्णालयात महिला आणि १२ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांवर अत्याधुनिक पध्दतीने उपचार केले जातील. त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान…

Read More

प्रत्येक जिल्ह्यात लग्नपूर्व समुपदेशन कक्ष स्थापन करणार : राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : लग्न झाल्यानंतर थोडया थोड्या गोष्टीतून भांडणे होऊन त्याचे रूपांतर घटस्फ़ोटात होते. घटस्फ़ोट होणे दोघांसाठीही क्लेशदायक असतो. हे टाळण्यासाठी लग्नपूर्व समुपदेशन होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे असे समुपदेशन कक्ष जिल्हा स्तरावर होण्यासाठी आपले शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक…

Read More

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७६ वा वर्धापन दिन संपन्न : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदेड ( वास्तव पोस्ट ) : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज दि.१७ रोजी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी मराठवाडा मुक्तिदिन समारंभात माता गुजरीजी विसावा उद्यान येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मंत्री महाजन व मान्यवरांच्या हस्ते मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम…

Read More

आतिशी होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री; विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी झाली निवड

DELHI NEW CM : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंतत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम आदमी पक्षाने सुरू केलेला नव्या चेहऱ्याचा शोध संपला आहे. दिल्ली आप सरकारमधील विद्यमान मंत्री आतिशी मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : केजरीवाल यांच्या तुरुंगवासानंतर सरकारमधील सर्वात शक्तिशाली मंत्री म्हणून उदयास आलेल्या आतिशी ह्या दिल्लीच्या…

Read More

राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश के.के. तातेड यांनी पोलिस स्टेशन, सुधारगृह आणि कारागृहाला दिली भेट

सुधारगृहामधील मुलांच्या कला गुणांना वाव दिल्याबद्दल मानवाधिकार आयोगांच्या चेअरमन यांनी केले प्रशासनाचे कौतुक जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रिमांड होम मधील मुलांच्या कला गुणांना वाव म्हणून त्यांना रांगोळी, चित्र काढणे, ढोल वाजवीणे,अशा कलांना प्रोत्साहन देण्याची कृती म्हणजे एका अर्थाने त्यांच्या उर्जेला सकारात्मक दिशा देणे आहे. असे अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक राज्य…

Read More

जनसामान्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास वृद्धिंगत करण्यात वकिलांची भूमिका महत्त्वाची : न्यायमूर्ती संजीव खन्ना

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट) : वकिल हा एक कायदेविषयक कौशल्य व जबाबदारीचे भान असणारा व्यक्ति असतो. समाजाच्या भल्यासाठी, जनसामान्यांमध्ये कायदेविषयक भान जागवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असतो. त्यामुळेच जनसामान्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास वृद्धिंगत करण्यात वकिलांची भूमिका ही खुप महत्त्वाची असते, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे केले….

Read More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेट

पुणे ( वास्तव पोस्ट ) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि आरती केली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा विविध मंडळांच्यावतीने सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालिम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ केसरीवाडा…

Read More

द.कोरियाला हरवत टीम इंडिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये ; विजेतेपदासाठी चीन सोबत लढणार !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी आज दि.१६ रोजी जोरदार खेळ करत कोरियन संघाचा ४-१ ने धुव्वा उडवला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होणार आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंनी पहिल्या क्वार्टरमध्येच आक्रमक खेळ दाखवत गोल करण्याच्या…

Read More

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुजित सुरवाडे ‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने सन्मानित

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अभियंता दिनानिमित्त राज्‍यस्‍तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार २०२३-२४ वितरण सोहळा सुरेश भट सभागृह नागपूर येथे उत्‍साहात पार पडला. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उत्‍कृष्‍ट कार्य करणारे अभियंते, वास्‍तुशास्‍त्रज्ञ, तांत्रिक, अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी यांचा कुटुंबियांसह सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी मुळचे जळगाव येथील मूळ रहीवासी असलेले व सध्या इमारत संकल्पचित्र मंडळ…

Read More

आदिवासी समाजातुन पहिल्या आय.ए.एस. अधिकारी वेवोतोलू केझो यांचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांनी भारतीय प्रशासन सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी वेवोतोलू केझो यांचा सन्मान केला. नागालँड येथील आदिवासी समाजातून पहिल्या महिला आय.ए.एस. अधिकारी होण्याचा मान वेवोतोलू केझो यांना मिळाला असून सध्या त्या प्रशिक्षणार्थी आय.ए.एस अधिकारी म्हणून जळगाव येथे रुजू आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सर्व सदस्यांना…

Read More

बासमती तांदूळ व कांद्यावरील निर्यात मुल्य रद्द करण्याचा मोठा निर्णयक

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : शेतकऱ्यांचा भल्याचा विचार करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कच्च्या खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविण्यासह बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी सुद्धा किमान निर्यात किंमत (एमईपी) ही पूर्णपणे मागे घेण्यात आली आहे. कांद्यावरील किमान निर्यात मुल्य रद्द करण्याचा निर्णय हा अत्यंत लाखमोलाचा आहे. रिफाईन तेलावर आयात शुल्क ३२.५० टक्के करण्यात आला आहे. या…

Read More

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहरात दि.७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत असून शहरातील सार्वजनिक, खाजगी, व घरगुती श्री गणेश मुर्तींचे विसर्जन मिरवणुकांसाठी होणारी गर्दी पाहता शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत. जळगाव ते पाचोऱ्या वरुन येणाऱ्या व जाणाऱ्या एस.टी….

Read More

एकही आदिवासी बांधव त्यांच्या हक्कापासून वंचीत राहणार नाही : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष अंतरसिंह आर्य

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सरकारनें आदिवासींच्या न्याय हक्कासाठी कायदे केले आहेत, त्या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करायला लावण्याबरोबर एकही आदिवासी बांधव त्यांच्या हक्कापासून वंचीत राहणार नाही याबाबतीत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने १०० दिवसाचा कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंह आर्य यांनी दिली. अंतर सिंह आर्य हे…

Read More
error: Content is protected !!