Headlines

SANDIP RANDHE

नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ साठी १५२७ कोटींचे अर्थसहाय्य

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १ हजार ५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात प्रकल्प करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read More

बीड येथील घटना गंभीर असून आरोपींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील घटना गंभीर असून यास सरकारने गांभीर्याने घेतले आहे. संबंधीत आरोपी व दोषी पोलीसांवर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणातील आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २८९ अन्वये उपस्थित केलेल्या बीड…

Read More

कलाविश्वाचा ताल चुकला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : भारतीय अभिजात संगीताचा समृद्ध खजिना सातासमुद्रापार दोन्ही हातांनी उधळणारे प्रतिभावान संगीतकार आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे जाणे, संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, भारतीय शास्त्रीय…

Read More

आज ३९ मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ ; जळगाव जिल्ह्यातून ३ मंत्री !

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात भाजप १९, शिवसेना शिंदे गट ११, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवल्यानंतर, राज्याच्या नव्या सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर पूर्ण झाला आहे. आज नागपूर येथील राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात एकूण…

Read More

के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग व व्यवस्थापन महाविद्यालयात व्हर्चुअल फॅकल्टी डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम उत्साहात संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात Inspira Research Association (IRA) जयपूर, राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२७ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२४ या दरम्यान फॅकल्टी डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम उत्साहात संपन्न झाला. ए आय ( Artificial Intelligence ) सह संशोधन पद्धतीवर प्रभुत्व मिळवणे (डेटा विश्लेषण)(MRMAI २०२४) हा या…

Read More

जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी किसान सभा कार्ड वाटप कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यात दि.१३ डिसेंबर ते दि. २६ जानेवारी २०२५ पर्यंत वैज्ञानिक तथा औद्योगिक संशोधन परिषद CSIR व राष्ट्रीय विज्ञान संचार तथा नीती संशोधन परिषद NISCPR आणि सर्वोदय इन्फोटेक यांनी मिळून भारतातील शेतकऱ्यांसाठी ‘किसान सभा एप्लीकेशन’ ची निर्मिती केलेली आहे. या किसान कार्ड एप्लीकेशनच्या माध्यमातून भारतातील सर्व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने…

Read More

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे अविष्कार २०२४ स्पर्धेत यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव द्वारे चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय चोपडा येथे ‘अविष्कार २०२४’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि.५ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जवळपास २००० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या श्रेणीत संशोधन पोस्टर द्वारे सादर केले. के.सी.ई. महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातील ५…

Read More

‘पुष्पा-२’ चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन यास अटक !

हैद्राबाद ( वास्तव पोस्ट ) : पुष्पा-2 अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक का केली? तेही अशा वेळी जेव्हा पुष्पा-2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनला अचानक अटक झाल्याने सर्वच चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर एक…

Read More

महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथ घेण्यास नकार ; निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रातील विरोधी महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) सदस्यांनी शनिवारी तीन दिवसीय विशेष विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार म्हणून शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा (ईव्हीएम) गैरवापर आणि निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सकाळी ११ वाजता सुरू झाले,…

Read More

‘आचार्य बाळ शास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’च्या मासिक सन्मान निधीत वाढ होणार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’ अंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांचे मासिक मानधन २०,००० रुपये करण्याची घोषणा केली. यासोबतच या योजनेचे नियम शिथिल करण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. मंत्रालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच मंत्रालयातील पत्रकार कक्षात पोहोचले,…

Read More

शरद पवार आणि राहुल गांधी मारकडवाडी येथे देणार भेट; ईव्हीएम विरोधात लाँग मार्चची तयारी !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : जेष्ठ नेते शरद पवार आणि राहुल गांधी मारकडवाडीत ईव्हीएम विरोधातील आंदोलनाला गती देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी मारकडवाडीला भेट देतील, तर राहुल गांधी तिथून ईव्हीएम विरोधी मोर्चा काढतील. पदाधिकारी व अनेक गावकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरद्वारे चाचणी मतदान घेण्याचा वाद अधिकच चिघळला आहे….

Read More

मोठी बातमी : ईडी ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जप्त केलेली संपत्ती मुक्त करण्याचे आदेश ट्रिब्यूनल कोर्टाने आयकर विभागाला दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने २०२१ मध्ये संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. अजित पवार यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर…

Read More

बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी निमित्त ‘स्मरण बहिणाईचे’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी व लेवागणबोली दिना निमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यामार्फत जुने जळगावातील रामपेठ, चौधरीवाडा, बहिणाई स्मृती संग्रहालय येथे उद्या दि. ३ डिसेंबर ला सकाळी १० वाजता ‘स्मरण बहिणाईचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे…

Read More

आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात : उद्योजक अशोक जैन

युवा कवयित्री पलक झंवर हिच्या ‘पलकोसे खुली कल्पनाए’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी मान्यवर… जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘पलको से खुली कल्पनाए’ केवळ शब्दांची जुळणी नाही तर आयुष्यातील विविध भावनांचा खोलपणा दाखवणारा संग्रह आहे. युवा कवयित्रीने अल्पवयात जीवनाचे सार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात, असे प्रतिपादन जैन उद्योग…

Read More

दरे गाव येथे एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य ; मी माझा निर्णय आधीच स्पस्ट केला आहे !

सातारा ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळगावी साताऱ्यातील दरेगाव येथे गेल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज दरेगाव इथे पत्रकार परिषद घेऊन जनतेकडून मिळालेल्या कौलाबद्दल मोठा खुलासा केला. निवडणुकीच्या धावपळीमुळे…

Read More
Top
error: Content is protected !!