अमित शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे देशभरात तीव्र पडसाद ; विरोधी पक्षाकडून माफी आणि राजीनाम्याची मागणी
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. संविधानामुळेच अमित शाह हे गृहमंत्री झाल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.”भाजपा पक्ष आणि उर्मट नेते हे महापुरुषांचा अपमान करत आहेत. अमित शाहांकडून बाबासाहेबांचा हिणकस आणि उद्दाम प्रकारे उल्लेख करण्यात…
