Headlines
Home » सामाजिक » वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन

वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन

पाचोरा | दि. १५ (वास्तव पोस्ट न्यूज ) – राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवात सहभागी होऊन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभागी होऊन त्यांना वंदन केले.

स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजे संभाजी महाराज यांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यानंतर सायंकाळी पाचोरा शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात हजारो शिवप्रेमी आबालवृध्द मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या महान जीवन कार्यावर आधारित विविध देखावे हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते.

दरम्यान, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी या आपल्या सर्व सहकार्‍यांसह या शोभायात्रेत सहभागी झाल्या. त्यांनी संभाजीराजे यांना वंदन करतांना त्यांच्या जीवन कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!