कजगाव , दि.२२, ( वास्तव पोस्ट न्यूज) दिपक अमृतकर | कजगाव येथे आज श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली गावातील सुतार बांधवांकडून श्री विश्वकर्मा जयंती निमित्त संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली तसेच कजगाव येथील लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन यांच्या हस्ते श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गावातील सर्व सुतार बांधव ,महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुतार बांधवांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
