Headlines
Home » महाराष्ट्र » ‘नमो दिव्यांग शक्ती’ अभियानांतर्गत राज्यात ७३ दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संकल्प

‘नमो दिव्यांग शक्ती’ अभियानांतर्गत राज्यात ७३ दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संकल्प

मुंबई, दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडली.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

‘नमो दिव्यांग शक्ती’ अभियानांतर्गत राज्यात ७३ दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे. यात दिव्यांगाना सक्षम करण्यासाठी विविध साधनांची उपलब्धता राहील, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयुक्त प्रवीण पुरी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!