Home » मनोरंजन » जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

मुंबई दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते तथा भारतीय जनता पक्षाचे नेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली असुन, खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत . त्यांना आज (१० फेब्रुवारी) सकाळी अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे त्यांना उपचारासाठी कोलकाता येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शिवाय त्यांचा MRI करण्यात आल्याचं म्हटलं आहे. न्यूरोलॉजिस्ट संजय भौमिक आणि देबब्रता चक्रबर्ती हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्याशिवाय मिथून चक्रवर्ती यांनी त्यांच्या शरीराचा उजवा भाग सुन्न झाल्याचे म्हटले.

मिथुन चक्रवर्ती यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं की त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आलं . सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते १००% ठीक आहेत आणि हे त्यांचे रुटीन चेकअप आहे अशी माहिती त्यांचा मोठा मुलगा मिमोहने माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!