Headlines
Home » मनोरंजन » डिस्ने-रिलायन्सची हातमिळवणी; मीडिया-मनोरंजन क्षेत्रात उडणार खळबळ; ऐतिहासिक करार :मुकेश अंबानी

डिस्ने-रिलायन्सची हातमिळवणी; मीडिया-मनोरंजन क्षेत्रात उडणार खळबळ; ऐतिहासिक करार :मुकेश अंबानी

मुंबई | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आशियातील अतिश्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ आणि ‘वॉल्ट डिस्ने’ यांच्यात मनोरंजन व मीडिया क्षेत्रातील सर्वात मोठ्या विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब झाला. या विलीनीकरणामुळे टीव्ही ब्रॉडकास्टिंग आणि स्ट्रीमिंगचे संपूर्ण चित्रच बदलण्याची दाट शक्यता नाकारता येत नाह. लोकांना यामुळे सहज व चांगले कन्टेंट मिळणार आहे.

नीता अंबानींकडे असणार मोठी जबाबदारी :
दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर अस्तित्वात येणाऱ्या कंपनीच्या अध्यक्षा नीता अंबानी तर उपाध्यक्षपदी उदय शंकर हे असतील. या संयुक्त उपक्रमात रिलायन्स ११,५०० कोटी रुपयांची गुंतवणूकही करेल. तसेच रिलायन्स आणि तिच्या उपकंपन्यांचा कंपनीतील एकूण हिस्सा ६३.१६% असेल तर डिस्नेचा ३६.८४% हिस्सा असेल.

ऐतिहासिक करार : या करारामुळे मुकेश अंबानी यांनी आनंद व्यक्त केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले की, ‘हा एक ऐतिहासिक करार आहे. यामुळे भारतीय मनोरंजन उद्योगात एका नव्या युगाची सुरुवात होईल. रिलायन्स आणि डिस्ने या दोघांच्या स्वतःच्या स्ट्रीमिंग सेवा असून त्यामध्ये एकूण १२० चॅनेल आहेत. या करारामुळे भारतातील २८ अब्ज डॉलर मीडिया आणि मनोरंजन बाजारावर रिलायन्सची पकड आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!