Headlines
Home » कृषी » महा शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे राज्यात आंबा महोत्सवाचं आयोजन

महा शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे राज्यात आंबा महोत्सवाचं आयोजन

पुणे | दि. ०६( वास्तव पोस्ट न्यूज ) – पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या आंबा महोत्सवाच्या धर्तीवर महा शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे यंदा संपूर्ण राज्यात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातून कोकणच्या या राजाचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत असून महा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या या विभागातील ५० हून अधिक शाखांनी विक्री करण्याची तयारी दर्शवली आहे.

या महोत्सवामुळं शहराच्या अन्य भागात स्वतंत्रपणे आंबा विक्री करण्याची आवश्यकता नसल्याची प्रतिक्रिया अनेक आंबा उत्पादकांनी व्यक्त केली आहे. कोकणातील हापूस आंबा राज्यातील १२ श्रेणीतील १२३ शहरांमध्ये उपलब्ध व्हावा यासाठी आंबा महोत्सव राज्यभर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात म्हणाले की, मराठवाडा आणि विदर्भातील ५० एफपीसी तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी स्टॉल्स लावतील आणि कोकणातील आंबा उत्पादकांना त्यांचे उत्पादन विकता येईल. उत्पादकांना अधिकाधिक प्रवेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या वर्षी, आम्ही आमच्या सदस्यांचा अधिकाधिक पोहोच वाढवण्यासाठी वापरणार आहोत, यावर्षी प्रत्येकी पाच डझन आंब्यांच्या १०,००० पेट्यांची विक्री करण्याचा विचार असल्याचे थोरात यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही या महोत्सवासाठी कोकणातील सुमारे १० शेतकरी आणि १ एफपीसी यांच्याशी करार केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!