भडगाव | दि ०३( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते तालुक्यातील कजगाव येथे पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
आज सर्वत्र पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले. यात बालकांना पोलिओचे डोसेस देण्यात आले. या अनुषंगाने कजगाव येथे ग्रामीण रूग्णालयात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी वैशालीताई यांनी पोलिओ हा अतिशय भयंकर व्याधी असून याच्या निराकरणासाठी प्रत्येक बालकाला याचे डोस देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख दीपक राजपूत शेतकरी संघटनेचे अरुण भाऊ पाटील ज्येष्ठ शिवसैनिक रमेश बाफना, बाळू अण्णा उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील, कजगाव येथील सरपंच रघुनाथ महाजन, बबलू पाटील, भास्कर सोनार शिवसेना पदाधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.
