Headlines
Home » सामाजिक » भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी आसिफ मणियार यांची निवड

भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी आसिफ मणियार यांची निवड

कजगाव | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर ; भडगाव येथील रहिवासी व भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आसिफ शे.शफी मणियार यांची भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असलेले आसिफ मणियार यांना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण यांनी निवड बद्दल नियुक्ती पत्र दिले. मणियार तसेच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल शिंदे, तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, माजी उपसरपंच शफी मणियार, ग्रामपंचायत सदस्य सादिक मन्यार, पत्रकार अमीन पिंजारी, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!