Home » सामाजिक » छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे वाशिममध्ये अनावरण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे वाशिममध्ये अनावरण

वाशिम | दि.०५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – वाशिम नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने वाशिमकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवरायांच्या जयघोष शिवप्रेमींकडून केला जात होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांचे स्वागत केले. सोहळ्याला स्थानिक नागरिक, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या कामासाठी वाशिम नगरपरिषदेमार्फत १.२५ कोटी खर्च करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा जमिनीपासून ३५ फूट उंच आणि अश्वारुढ पुतळा १३ फूट उंच असल्याची माहिती देण्यात आली.

गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ऍड. किरण सरनाईक, माजी मंत्री महादेवराव जानकर, गोपीकिशन बाजोरिया, विभागीय आयुक्त डॅा. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, पोलीस अधीक्षक अनुज तारे, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर यांनी सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!