झारखंड | दि.०५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – झारखंडमधील स्पॅनिश गँगरेप पीडित महिला म्हणाली की, गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ह्या घटनेस प्रत्येक भारतीय जबाबदार आहेत असं नाही. इथले लोक खूप चांगले आहेत, त्यांनी आमची नेहमीच काळजी घेतली .
दरम्यान झारखंडमधील दुमका येथे एका स्पॅनिश महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी सातही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. पीडित स्पॅनिश महिलेने झारखंड पोलिसांच्या जलद कारवाईचे कौतुक केले आणि या घटनेद्वारे भारताची प्रतिमा डागाळणाऱ्यांना सल्लाही दिला.
गँगरेपची शिकार झालेल्या स्पॅनिश महिलेने सांगितले की, प्रत्येक भारतीय असा नसतो, ती गेल्या ६ महिन्यांपासून भारतात आहे, आणि लोकांनी तिला चांगली वागणूक दिली आहे. महिलेने सांगितले की, या घटनेसाठी मी भारतीय लोकांना जबाबदार धरणार नाही, इथले लोकं आमच्याशी चांगले वागले. पीडितेने सांगितले की, आम्ही जवळपास ६ महिन्यांपासून येथे आहोत ,आणि त्यांनी नेहमीच माझी काळजी घेतली आणि आम्हाला मदत केली. माझ्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून ते इतर कोणावरही असे कृत्य करण्याची हिंमत करू शकणार नाहीत, अशी शिक्षा दिली पाहिजे की असे कृत्य करणारे दूसरे लोकं देखील दोनदा विचार करतील.

