Headlines
Home » महाराष्ट्र » मनसेतुन दोन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी ; राज ठाकरेंकडून मोठी कारवाई

मनसेतुन दोन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी ; राज ठाकरेंकडून मोठी कारवाई

मुंबई दि. ८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातून दोन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करुन मोठी कारवाई केली आहे . परशुराम उपरकर आणि प्रवीण मर्गज अशी हकालपट्टी करण्यात आलेल्या दोन पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. पक्षातून हकालपट्टी का केली गेली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण राजकीय वर्तुळात या कारवाईमुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी महेश जाधव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्यात वाद झाला होता , तेव्हा मनसेने पक्षाचे कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांचीदेखील हकालपट्टी केली होती. त्यानंतर महेश जाधव यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यावेळी मनसेच्या दोन गटांमधील वाद थेट रस्त्यावरही आलेला बघायला मिळाला होता. त्यानंतर आता मनसे अध्यक्षांच्या आदेशानुसार आणखी दोन पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मनसे नेते शिरीष सावंत यांनी याबाबत एक परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. “राज ठाकरे यांच्या आदेशानुसार परशुराम उपरकर आणि प्रवीण मर्गज या दोघांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कोणताही संबंध असणार नाही, ह्याची तमाम महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी”, असं शिरीष सावंत म्हणाले आहेत. शिरीष सावंत यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांची पक्षातून का हकालपट्टी करण्यात आली? मात्र याबाबत कारण स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!