Home » होम » माकप कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा संपन्न

माकप कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा संपन्न

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : नाशिक पश्चिम विधानसभेची निवडणूक माकप नेते डॉ. डी.एल. कराड लढणार आहेत. शनिवार दि.५ ऑक्टोबर रोजी सातपूर गावातील संत सावता क्षत्रिय काशीमाळी मंगल कार्यालयात माकप पदाधिकाऱ्यांचा मेळावा कॉ.सिताराम ठोंबरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी कामगार, कष्टकरी, शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. कराड यांची उमेदवारी असल्याचे प्रतिपादन शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर सातपूर गावाचे पोलीस पाटील राजाराम पाटील निगळ, माजी नगरसेवक ॲड. तानाजी जायभावे, माजी नगरसेवक सचिन भोर, माजी नगरसेविका ॲड. वसुधा कराड, गोकुळ घुगे, सिंधु शार्दुल, दगडू व्हडगरचेतन भंदुरे, संतोष काकडे, कैलास धात्रक यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

माकप पदाधिकारी मेळाव्यात बोलतांना पुढे शेतकरी नेते डॉ. नवले म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कामगार, कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी सातत्याने लढाऊ व मुद्देसुद प्रश्न मांडणारे डॉ. कराड सक्षम नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत माकप पक्षाने पूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीला मदत केली. यावेळी पश्चिम विधानसभा मतदार संघातून डॉ. कराड यांना महाविकास आघाडी कडून जागा मिळणार असल्याने आतापासूनच सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी केले.

याप्रसंगी कामगार नेते तथा माकप विधानसभेचे उमेदवार डॉ. कराड यांनी सातत्याने कामगार, कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी शासन दरबारी समस्या मांडत आलो आहे. नाशिक शहरातील सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत आतापर्यंत कुठल्याही कामगार संघटनेने कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी केलेले नाही. केवळ सिटू मार्फत कंत्राटी कामगार कायमस्वरूपी करण्याचे काम केले जाते. कामगारांचा आवाज विधानसभेत उठवण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संधीचे सोने करून माकप पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या. महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळणार असल्याने कामगार, कष्टकरी व शेतकऱ्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन डॉ. कराड यांनी केले.

माकप मेळाव्यात गुणवंत शिंदे, अमर शेवकर, सुनील गमे,राजेंद्र पाटील, सतीश खैरनार, बॅरीस्टरसिंग, युवराज मगरेसह विविध कारखान्यातील संघटना पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अभी नही, तो कभी नही! अशा घोषणा देत डॉ. कराडांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन माकप पदाधिकारी यांनी केले. मेळाव्याला अध्यक्षस्थानी असलेले कॉ. ठोंबरे यांनी सांगितले की, कुठल्याही भूलथापांना बळी न पडता एकजुटीने डॉ. कराड यांच्या पाठीशी उभे राहण्याचे सांगितले. मेळाव्याला संजय पवार, गौतम कोंगळे, छाया जाधव, मोहन जाधव, युवराज पाटील, पुरुषोत्तम गायकवाड, हिरामण तेलोरे, अरविंद शहापुरे, तुकाराम सोनजेसह सातपूर भागातील माकप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

One thought on “माकप कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा संपन्न

  1. सर्वसामान्य जनतेचा आवाज डॉक्टर कराड हे विधानसभेत गेलेच पाहिजे ही काळाची गरज आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!