Headlines

परभणी हिंसा प्रकरण : मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा फेटाळला !

PARBHANI VIOLENCE : आम्हाला १० लाख नकोत, माझ्या मुलाला काहीही आजार नव्हता अशा शब्दात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सूर्यवंशी यास श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. नागपुर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीतील संविधानाच्या शिल्पाची विटंबना, त्यानंतर उफळलेला हिंसाचार आणि झालेल्या तोडफोडीबाबत विधिमंडळात सविस्तर माहिती…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले दिवंगत संतोष देशमुख यांच्या परिवाराचे सांत्वन

बीड ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईल या दृष्टिकोनातून शासन काम करीत आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींना फाशी दिली जाईल यासाठी मी स्वतः या प्रकरणात पूर्ण लक्ष देणार आहे, अशी ग्वाही देतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांच्या सांत्वन भेटप्रसंगी ते बोलत होते….

Read More

कल्याण प्रकरण ; कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आले असून कारवाई सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या…

Read More

नीलकमल बोट दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदन

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलँडनजिक नीलकमल कंपनीच्या प्रवाशी बोटीला नौदलाच्या बोटीने दिलेल्या धडकेत एकूण ११० प्रवाशांपैकी ९६ प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज निषेध

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय घटनेचे शिल्पकार तसेच दिन दुबळ्यांचे कैवारी तथा समस्त मानवाला हक्क आणि अधिकार प्रदान करून त्याचे आयुष्य स्वर्गापेक्षा अधिक सुंदर बनवणारे विश्वरत्न डॉ. भिमराव रामजी आंबेडकर अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मंगळवार दि.१७ रोजी अमित शाह यांनी भर संसदेत अपमानजनक वक्तव्य केल्याने संपूर्ण देशात अमित शाह यांच्या विरोधात तीव्र…

Read More

मुंबईच्या किनाऱ्यावर बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू ! तर दोन जण गंभीर

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०१ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हवाल्याने दिली आहे. या दुर्घटनेतील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत…

Read More

नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ साठी १५२७ कोटींचे अर्थसहाय्य

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १ हजार ५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात प्रकल्प करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read More

बीड येथील घटना गंभीर असून आरोपींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील घटना गंभीर असून यास सरकारने गांभीर्याने घेतले आहे. संबंधीत आरोपी व दोषी पोलीसांवर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणातील आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २८९ अन्वये उपस्थित केलेल्या बीड…

Read More

कलाविश्वाचा ताल चुकला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : भारतीय अभिजात संगीताचा समृद्ध खजिना सातासमुद्रापार दोन्ही हातांनी उधळणारे प्रतिभावान संगीतकार आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे जाणे, संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, भारतीय शास्त्रीय…

Read More

आज ३९ मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ ; जळगाव जिल्ह्यातून ३ मंत्री !

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात भाजप १९, शिवसेना शिंदे गट ११, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवल्यानंतर, राज्याच्या नव्या सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर पूर्ण झाला आहे. आज नागपूर येथील राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात एकूण…

Read More

उत्पादन शुल्क विभागाकडून भेसळयुक्त ‘स्कॉच’ मद्याच्या बाटल्या जप्त

पुणे ( वास्तव पोस्ट ) : मद्यशौकिनांकडून ‘स्काॅच’ ला मागणी असते. महागड्या अशा ‘स्काॅच व्हिस्की’च्या बाटल्यांमध्ये भेसळ करण्यात येत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करुन भेसळयुक्त स्काॅचच्या २४ बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. धनजी जेठा पटेल असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव…

Read More

महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथ घेण्यास नकार ; निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रातील विरोधी महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) सदस्यांनी शनिवारी तीन दिवसीय विशेष विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार म्हणून शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा (ईव्हीएम) गैरवापर आणि निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सकाळी ११ वाजता सुरू झाले,…

Read More

‘आचार्य बाळ शास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’च्या मासिक सन्मान निधीत वाढ होणार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’ अंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांचे मासिक मानधन २०,००० रुपये करण्याची घोषणा केली. यासोबतच या योजनेचे नियम शिथिल करण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. मंत्रालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच मंत्रालयातील पत्रकार कक्षात पोहोचले,…

Read More

ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : विधानसभेचे दि.७ ते ९ डिसेंबर या कालावधीत तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा सदस्य कालीदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांची विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केल्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली. विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित सदस्य यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी…

Read More

मोठी बातमी : ईडी ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जप्त केलेली संपत्ती मुक्त करण्याचे आदेश ट्रिब्यूनल कोर्टाने आयकर विभागाला दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने २०२१ मध्ये संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. अजित पवार यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर…

Read More
error: Content is protected !!