Headlines
Home » महाराष्ट्र » मोठी बातमी : ईडी ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश !

मोठी बातमी : ईडी ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जप्त केलेली संपत्ती मुक्त करण्याचे आदेश ट्रिब्यूनल कोर्टाने आयकर विभागाला दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने २०२१ मध्ये संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. अजित पवार यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली आहे.

अजित पवारांच्या स्पार्कलिंग सॉईल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर ॲग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. पण अखेर कोर्टाच्या आदेशानंतर या मालमत्ता मुक्त करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे अजित पवार यांनी ५ डिसेंबरला सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने काही महिन्यांपूर्वी अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या काही मालमत्तांवर आयकर विभागाने कारवाई केली होती. या कारवाई विरोधात पवार कुटुंबियांनी कोर्टात धाव घेतली होती.

संबंधित कारवाई स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका वारंवार करण्यात आल्या होत्या. यानंतर स्थगितीची ऑर्डर काढण्यात आली होती. पण जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली नव्हती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!