Headlines
Home » जळगाव » Page 49

‘दिशा’ समितीत २७ विभागांचा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी घेतला आढावा

Disha Committee Meeting : ‘दिशा’ बैठकीत जिल्ह्यातील पी.एम. किसान कार्ड, रेल्वेची कामे, तसेच जिल्ह्यातून जाणारा महामार्ग यांबाबत अडचणी दूर करून कामे मिशन मोडवर पूर्ण करा असे निर्देश देण्यात आले. तसेच अटल योजना, प्रलंबित सिंचन प्रकल्प, दीपनगर येथील नवा प्रकल्प आदी कामांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात…

Read More

कविवर्य ना.धों. महानोर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मू. जे. महाविद्यालयात कार्यक्रम साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कविवर्य ना.धों. महानोर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मू.जे. महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने ‘ह्या शेताने लळा लाविला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला कविवर्य ना.धों. महानोर यांच्या प्रतिमेला भाषा प्रशाळा संचालक डॉ. भूपेंद्र केसुर, सामाजिकशास्त्रे प्रशाळा संचालक प्रा. देवेंद्र इंगळे, मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण…

Read More

‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांच्यावतीने वावडदा शाळेत वृक्षारोपण

वृक्ष लागवडीचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांचा मानस जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : माध्यमिक विद्यालय वावडदा ता. जि. जळगाव, या शाळेत वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम गांधी रिसर्च फौंडेशन व माध्यमिक विद्यालय वावडदा याच्या संयुक्त विद्यमानाने उत्साहात हाती घेतला आहे. वन महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत व एक पेड माँ के नाम या धोरणानुसार शाळेच्या परिसरात वृक्षारोपण…

Read More

इनर व्हील क्लब जळगाव तर्फे जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त महिलांमध्ये जनजागृती

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त इनर व्हील क्लब ३०३ जळगाव तर्फे शासकिय महाविद्यालयात सिविल हॉस्पिटल येथे महिलांमध्ये स्तनपानाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी ४२ महिलांना गाईचे गावरानी तुप, शतावरी, राजगिरा लाडू, बिस्कीट सह अन्य साहित्य वाटप केले. यावेळी नवजात शिशू विभागाचे प्रमुख व मदर मिल्क बँकच्या संचालिका डॉ. शैलेजा चौहान,…

Read More

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथि मू.जे. महाविद्यालय साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आज मू.जे. महाविद्यालयात “साहित्य कला व सांस्कृतिक मंडळाच्या” वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाषा प्रशालेचे संचालक प्रो.भूपेन्द्र केसूर आणि समाजशास्त्र प्रशालेचे संचालक प्रा.देवेंद्र इंगळे व महाविद्यालयातील प्राध्यापक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी…

Read More

रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ३ रोजी जळगावात

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजिंदरसिंह खुराणा ( नागपूर) हे दि.३ ऑगस्ट रोजी ऑफिशियल क्लब व्हिजिटसाठी जळगावात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरात दिवसभर विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खुराणा यांच्या मुख्य उपस्थितीत महाबळमधील टोके शाळेत रेन वॉटर हार्वस्टिंगचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यांच्या हस्ते…

Read More

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे कन्सोलिडेटेड आणि स्टँडअलोन आर्थिक निकाल जाहीर केले. ३१ जुलै रोजी मुंबई येथे संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कंपनीचे कन्सॉलिडेटेड (एकत्रित) उत्पन्न जवळजवळ १४७८ कोटी रुपये झाले. कर, व्याज व घसारापूर्व नफा…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महसूल पंधरवाड्याचे औचित्य साधून अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.१ऑगस्ट ते ४ऑगस्ट दरम्यान भोगवटाधारक २ चे भोगवटाधारक १ मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर आयोजित केले आहे. या विशेष शिबीराचा ज्या भोगवटाधारकांचे प्रलंबित दावे आहेत, त्यांनी लाभ घ्यावा असे महसूल प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. हे शिबीर दि.१ ऑगस्ट…

Read More

जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशन द्वारा पाचवी नॅशनल योगासन स्पोर्टस चॅम्पियनशिप आगामी काळात होणार आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या राजस्तरीय योगासन संघाची निवड ही राज्य योगासन स्पर्धेतून केली जाणार आहे. त्या अनुषंगाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेतून राज्य संघात निवड होणे गरजेचे आहे. त्या हेतूने…

Read More

पी.एम.मुंदडे विद्यालयात “सायबर सुरक्षा” या विषयावर व्याख्यान

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पिंप्राळा उपनगरातील पी.एम.मुंदडे माध्यमिक विद्यालय येथे आज दि.३० रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील विद्यार्थी प्रमोद विनोद सोन्नी व प्रतीक संजय उगले यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूक करणेसाठी अनमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी सर्व प्रथम दोन्ही विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कुमावत यांनी…

Read More

फसवणुक टाळण्यासाठी अधिकृत परवानाधारक केळी व्यापाऱ्यांशी व्यवहार करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Banana auction and settlement : केळी लिलाव व स्थिर भाव यावर रावेर येथे आयोजित चर्चासत्रात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधुन अडचणी समजुन घेतल्या. तसेच स्थिरभावासाठी उपाययोजना सांगीतल्या. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व केळी व्यापारी उपस्थित होते. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : केळी उत्पादक शेतकरी यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक…

Read More

हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणावर तापी नदीपात्रात ५५३०३ क्युसेक्स एवढा विसर्ग

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. सध्या हतनूर धरणातून ५५३०३ क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणावर तो विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. धरण परिसरातील गावांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रातील विसर्गामुळे तापी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने, तापी नदीकाठच्या नागरीकांनी आवश्यक…

Read More

ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी आयएमआर आणि डब्ल्यूएनएस यांच्यात करार

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि पुणे स्थित डब्ल्यूएनएस केअर फाउंडेशनमध्ये आयएमआरच्या विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी तीन वर्षांकरिता करार करण्यात आला. या करारातंर्गत डब्ल्यूएनएस ही कंपनी आयएमआरच्या विद्यार्थ्यांना तीन प्रकारच्या कोर्सेसची ट्रेनिंग देईल. पहिले ट्रेनिंग अकाऊंटिंग आणि फायनान्स असेल. यात पेमेंट अँड टॅक्स,…

Read More

कान्ह ललित कला केंद्रातर्फे ३ रोजी ‘वाघमार्‍या जानकीराम’ नाट्य प्रयोग ; अस्सल अहीराणी भाषेत

जळगाव (वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित कान्ह ललित कला केंद्रातर्फे पहिल्यांदाच मनोज पाटील लिखित आणि हास्यजत्रा फेम हेमंत पाटील दिग्दर्शित ‘वाघमार्‍या जानकीराम’ या नाटकाच्या निमित्ताने व्यावसायिक निर्मितीत पाऊल ठेवण्यात येत आहे. पुण्यात स्थायिक असलेल्या खास खान्देशातील रसिक प्रेक्षकांसाठी ३ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात या नाटकाचा…

Read More

बॉस संघटनेतर्फे भावसार समाजाचा १३ जिल्ह्यात वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस (BOSS) तर्फे दि.२८ जुलै रोजी जागतिक प्रकृती संवर्धन दिनानिमित्त नियोजित असलेला वृक्षारोपण बॉस या संघटनेतर्फे भावसार समाजाचा महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यात भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यवतमाळ, सटाणा, मालेगाव, वर्धा, मलकापूर, निजामपूर, जालना, जळगाव, नांदेड, बीड, संभाजीनगर,…

Read More
error: Content is protected !!