Headlines

दिपक जाधव

१०० वे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर नावजले जाईल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमळनेर दि.५ ( प्रतिनिधी ) – ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले. साहित्य संमेलन ही आपली थोर परंपरा असून सांस्कृतिक विचारांची ही गंगा अखंड वाहते आहे. शंभराव्या साहित्य संमेलनाकडे वाटचाल करीत असून १०० वे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर नावाजले जाईल एवढ्या भव्य प्रमाणावर त्याचे आयोजन करण्यात येईल,…

Read More

वसतिगृहामुळे मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट सुकर ; पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील

अमळनेर तालुक्यात विकास कामांमध्ये विद्यार्थी हिताला प्राधान्य ; मंत्री श्री अनिल पाटील अमळनेर दि. ५ ( पतिनिधी ) – सामाजिक न्याय विभागाच्या मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे लोकार्पण संपन्न सुसज्ज इमारतीत १०० विद्यार्थिनींना लाभ मिळणार आहे .शासनाने समाजातील वंचित घटकाच्या विकासासाठी प्राधान्य दिले असून शासकीय वसतिगृहांमुळे विद्यार्थिनींची शिक्षणाची वाट सुकर होणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री…

Read More

CASGC 2024: न्याय संकल्पनेत पर्यावरणीय न्यायाचाही समावेश असावा ; राष्ट्रकुल परिषदेत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

दिल्ली दि.५ ( प्रतिनिधी) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल लीगल एज्युकेशन असोसिएशन (सीएलईए) च्या – राष्ट्रकुल देशांचे ॲटर्नी आणि सॉलिसिटर जनरल यांची परिषद (CASGC) २०२४ च्या समापन सोहळ्याला उपस्थित राहून संबोधित केले. समाजाच्या नैतिक व्यवस्थेची व्याख्या करण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि राजनीती या तीन वैशिष्ट्यांचे एकत्रित येणे आवश्यक आहे, असे त्या…

Read More

साहित्यिक पद्मश्री आदरणीय श्री. गिरीशजी प्रभुणे यांचेकडून समतोल प्रकल्पाच्या कार्याची प्रशंसा

जळगाव दि. ३ ( प्रतिनिधी )– आज दि ३ रोजी जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक आदरणीय श्री.गिरीशजी प्रभुणे यांच्यासोबत ग्रेट भेट झाली. ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अमळनेरला आले होते आणि परतीचा प्रवास रेल्वेने जळगावहून करणार होते. रेल्वेला विलंब झाल्यामुळे आमची भेट झाली. आदरणीय गिरीशजींना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीमध्ये…

Read More

“आपल्या घराचे स्वत: तीर्थंकर बना” – प.पू. प्रविणऋषीजी म.सा.

जळगाव दि. ४ ( प्रतिनिधी )– ‘कुठल्याही व्यक्तीला, दोषाला सुधारण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती, कडक अनुशासन करणारे गुरुजन, आई-वडील त्याला वाईट दिसतात हे वास्तव आहे. आपले ज्याच्याशी वैर आहे त्याविषयी आपण जेवढा क्रोध करत नाही तेवढा आई-वडील, सासू-सासरे यांच्याविषयी करतो. मारलेली ‘थप्पड’ लक्षात राहते मात्र प्रेमाने दिलेली ‘थप्पी’ हे लक्षात राहत नाही. त्यासाठी चांगले व्यक्तिमत्व घडवणाऱ्या…

Read More

गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांना ११ दिवसांची पोलिस कोठड़ी

ठाणे दि.३ ( प्रतिनिधी )– उल्हासनगर हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये काल झालेल्या गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांना आज उल्हासनगर कोर्टात हजर केले .व्हीसी द्वारे आरोपींना हजर करण्याची विनंती होती, मात्र कोर्टाकडून ही विनंती फेटाळण्यात आली . उल्हासनगर कोर्टाने गणपत गायकवाडांना ११ दिवसांची पोलिस कोठड़ी सुनावली . काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून कोर्ट परिसरात पोलिसांचा तगड़ा बंदोबस्त…

Read More

अडवाणी यांना भारतरत्न जाहीर ; माझे जीवन माझ्यासाठी नाही तर देशासाठी समर्पित आहे.

दिल्ली दि .३ ( प्रतिनिधी ) – अयोध्येतील राम मंदिर आंदोलनातील सर्वात मोठा चेहरा लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली . ९६ वर्षीय अडवाणी यांनी स्वतः या संदर्भात एक निवेदन जारी केले . लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आज मला प्रदान करण्यात आलेला ‘भारतरत्न’ मी…

Read More

विशाखापट्टणम कसोटीत दुसऱ्या दिवशी “जैस्वाल” द्विशतक झळकवण्यात “यशस्वी”

विशाखापट्टणम दि. ३ ( प्रतिनिधी ) इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दूसऱ्या दिवशी भारताने कालच्या ३३६/६ वरुन आपला डाव सुरु केला . त्यात आज सकाळी ६० धावांची भर घालून भारताचा पहीला डाव सर्वबाद ३९६ धावांवर आटोपला .आजच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे यशस्वी जैस्वालचे द्विशक भारताच्या या धड़ाकेबाज युवा फलंदाजाने कालच्या नाबाद १७९ वरुन आज…

Read More

कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी AI चा वापर

दिल्ली दि. ३ ( प्रतिनिधी )भारतातील कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील विविध आव्हाने सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ,आर्टिफिशियल इंटेलिजेंस ) पद्धती वापरल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ‘किसान ई-मित्र’ हा एआय-संचालित चॅटबॉट आहे जो शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या प्रश्नांसाठी मदत करतो. एकापेक्षा अनेक भाषांना हा चॅटबॉट समर्थपणे मदत करतो . AI…

Read More

वा.रा.सोनार ग्रंथ दालनात मतदार जागृती, ग्रंथ विक्री आणि निवडणूक विषयक प्रदर्शन दालनाचं उद्धाटन

अमळनेर दि. २ ( प्रतिनिधी )– अमळनेर इथं सुरु असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वा.रा.सोनार ग्रंथ दालनात उभारलेल्या, मतदार जागृती, ग्रंथ विक्री आणि निवडणूक विषयक प्रदर्शन दालनाचं आज सकाळी वैशाली बोरसे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सावखेडा, अमळनेर यांच्या हस्ते उद्घाटन झालं.राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, तसंच संमेलनात कार्यालयाच्या वतीनं आयोजीत ‘तृतीयपंथी समुदायाचे…

Read More

इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालचे दमदार शतक ; नाबाद १७९ धावा फटकावल्या

विशाखापट्टणम दि .२ ( प्रतिनिधी ) – इंग्लंड विरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील आज दि .२ रोजी दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नाबाद १७९* धावांच्या जोरावर ६ गड़ी बाद ३३६ धावांपर्यंत मजल मारली . जैस्वाल ने आपल्या कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. शुक्रवारी विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने…

Read More

६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील (हटकर) मनिषा हटकर व सोनल हटकर यांची बास्केटबॉल खेळाच्या पंच व तांत्रिक अधिकारी पदी निवड 

जळगाव दि.२ ( प्रतिनिधी )- ६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा २०२३ चे आयोजन दि. २१ ते २६ जानेवारी २४ दरम्यान कोईमतूर तामिळनाडू  झाले होते. बास्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील (हटकर) सहप्रशिक्षक व धनदाई माता महाविद्यालयाची विद्यार्थीनी मनिषा हटकर व मुळजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू सोनल…

Read More

कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे महाराष्ट्रातून चॅम्पियन

दुर्गेश्वरी योगेश धोंगडे हिचा सन्मान करताना (डावीकडून) अरूण केदार, यतिन ठाकूर, संदिप दिवे, केतन चिखले व मान्यवर जळगाव दि.०२ ( प्रतिनिधी )- मुंबई-दादर येथे ५७ वी सब ज्युनिअर महाराष्ट्र कॅरम स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. २८ ते २९ जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जळगावची दुर्गेश्वरी योगेश धोंगडे महाराष्ट्रातून चॅम्पियन ठरली. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे दुर्गेश्वरी…

Read More

अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम मजूरांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. जळगाव,दि.२ ( प्रतिनिधी) – अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,…

Read More

मुख्यमंत्र्यांनी दिले ग्रामरोजगार सेवकांचे गटविमा काढण्याचे निर्देश

राज्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली मुंबई दि. २ ( प्रतिनिधी )– ग्रामपंचायतस्तरावर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून ग्रामरोजगार सेवकांचा गटविमा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. ग्रामरोजगार सेवकांच्या पदनामात बदल करुन ते ग्रामरोजगार सहायक करण्यात येईल, असे जाहीर करतानाच मानधनात…

Read More
error: Content is protected !!