दिल्ली दि. ३ ( प्रतिनिधी )
भारतातील कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील विविध आव्हाने सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ,आर्टिफिशियल इंटेलिजेंस ) पद्धती वापरल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ‘किसान ई-मित्र’ हा एआय-संचालित चॅटबॉट आहे जो शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या प्रश्नांसाठी मदत करतो. एकापेक्षा अनेक भाषांना हा चॅटबॉट समर्थपणे मदत करतो . AI सुविधेचा इतर सरकारी कामकाजात देखील वापर करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.
हवामान बदलामुळे होणाऱ्या उत्पादनाच्या नुकसानाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणाली. प्रणाली पीक समस्या शोधण्यासाठी एआय आणि मशीन लर्निंगचा वापर केला जाणार आहे , यामुळे पिकांवर येणाऱ्या किड बाबतची माहीती वेळेआधिच AI तंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे .
भात आणि गहू पिकांसाठी उपग्रह, हवामान आणि जमिनीतील आर्द्रता डेटासेट वापरून पीक आरोग्य मूल्यांकन आणि पीक आरोग्य निरीक्षणासाठी फील्ड छायाचित्रे वापरून एआय आधारित विश्लेषण करणार आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री अर्जुन मुंडा यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

