आंतर शालेय मनपा बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये जयेश सपकाळे तर मुलींमध्ये माही संघवी प्रथम
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंतरशालेय महानगरपालिका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात मुलांमध्ये सेंट जोसेफच्या जयेश सपकाळे याने ६.५ गुणांसह तर मुलींमध्ये पोदार स्कूलची माही संंघवी ७ गुणांसह बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कांताई सभागृह येथे झालेल्या…
