Headlines
Home » होम » राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाअंतर्गत आज मानवसेवा माध्यमिक विद्यालयात बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाअंतर्गत आज मानवसेवा माध्यमिक विद्यालयात बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशान्वये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले. सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येत आहे.

या अंतर्गत आज दि.२४ जुलै रोजी “क्रीडा दिवस” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपशिक्षिका अलका महाजन, रत्ना चोपडे, अनिता शिरसाठ व गिरीष जाधव उपस्थित होते. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सुरुवातीला ‘क्रिडा प्रतिज्ञा’ घेण्यात आली व त्यानंतर विद्यार्थ्यांची बुद्धिबळ या खेळाची क्रीडा स्पर्धा घेण्यात आली व विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना भारतीय खेळ कोणकोणते आहेत ते सांगण्यात आले. मोबाईल पासून दूर राहून भारतीय, मैदानी खेळ खेळल्याने होणारे फायदे व महत्त्व क्रीडा शिक्षक गिरीश जाधव यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.

कार्यक्रमप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतिभा सुर्यवंशी यांनी आहार व आरोग्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना चोपडे यांनी तर आभार अलका महाजन यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!