Home » जळगाव » अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा

अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय येथे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात सुरुवातीला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी भाषिक कौशल्य या विषयावर के.सी.ई. सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक गोपीचंद धनगर सर यांनी व्याख्यान दिले. इयत्ता आठवी व नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी भाषिक कौशल्य या विषयाचे व्याख्यान आयोजित केले होते. श्रवण वाचन भाषण संभाषण ही मूलभूत कौशल्ये भाषा ज्ञान, व्यवहार आणि व्यक्तिमत्व यासाठी यांचा किती वेगवेगळ्या पद्धतीने वापर करता येतो याचे मार्गदर्शन उदाहरणांच्या माध्यमातून करून दिले.

यावेळी प्रत्येक वर्गात पाठ्यपुस्तकावर आधारित विद्यार्थ्यांचे गटागटाने अभिवाचन घेण्यात येऊन त्यावरच आधारित प्रश्न श्रवण कौशल्य म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना विचारले आणि विद्यार्थ्यांनी त्याची उत्तरे दिली. या उपक्रमाचे नियोजन शाळेतील निर्मल चतुर, डी.बी. चौधरी, रत्नमाला शिंदे, ई.पी पाचपांडे सुचिता बावस्कर यांनी केले.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मल चतुर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सी.डी.सोनार यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!