Headlines
Home » महाराष्ट्र » पुजारी, सेवकांची चारित्र्य पडताळणी करा; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

पुजारी, सेवकांची चारित्र्य पडताळणी करा; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कल्याण तालुक्यातील एका गणपती मंदिराच्या तीन पुजाऱ्यांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी धार्मिक स्थळांमध्ये कार्यरत सर्व कर्मचारी, पुजारी व पूर्णवेळ सेवकांची पोलीस ठाण्यामार्फत चारित्र्य पडताळणी करावी, अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यातील शिळगावात एका ३० वर्षीय महिलेवर येथील घोळ गणपती मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. या घटनेतील आरोपींना कडक शिक्षा व्हावी याकरिता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी, तसेच अशा घटना भविष्यात घडू नये याकरिता राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे येथे सीसीटीवी बसविण्यात यावेत, धार्मिक स्थळांमध्ये कार्यरत कर्मचारी, पुजारी व पूर्णवेळ सेवक यांची नजीकच्या पोलीस ठाण्यामार्फत चारित्र्य पडताळणी करण्यात यावी, तसेच महिलेचे आप्त व कुटुंबीयांना मानसोपचार सेवा व समुपदेशन पुरविण्यात यावे, अशी सूचना गोऱ्हे यांनी पत्रात केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!