Headlines
Home » सामाजिक » वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले अहिल्यादेवी होळकर यांना वंदन

वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले अहिल्यादेवी होळकर यांना वंदन

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी पिंपळगाव हरेश्‍वर येथील कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन केले.

आज सर्वत्र पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून अहिल्यादेवींच्या तेजस्वी कार्याचे स्मरण करतांना त्यांचा वारसा आपण समर्थपणे चालवायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली.

याच कार्यक्रमात पिंपळगाव हरेश्‍वर येथील नवनिर्वाचीत सरपंच सुनंदाताई कैलास क्षीरसागर यांचा वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ताईंनी त्यांना सरपंचपदाच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे, नवनिर्वाचित सरपंच सुनंदा क्षीरसागर, कैलास अप्पा, अजय तेली, बी. ड़ी. पाटील, सलीम सेठ, कोमल आबा, कमलेश मालकर, भागवत पाटील, राहुल बडगुजर, नाना सरकार, प्रीतेश जैन आदी मान्यवरांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!