Home » जळगाव » विद्यापीठाचा “उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव कर्मचारी” पुरस्कार कृष्णा गवळी यांना प्रदान

विद्यापीठाचा “उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव कर्मचारी” पुरस्कार कृष्णा गवळी यांना प्रदान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्च जळगाव चे कर्मचारी जळगावातील विद्यापीठाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये कृष्णा गवळी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा तर्फे उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार याना लोकाभिमुखवृत्तीने शैक्षणिक प्रशासन व सेवा या क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आर.डी. कुलकर्णी, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी, प्र. कुलगुरू एस.टी. इंगळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गवळी यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी मंचावर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, डॉ. संजीव गिरासे, प्रा. म.सु. पगारे, शिवाजी पाटील, ॲड. अमोल पाटील, नितीन झाल्टे, डॉ. पवित्रा पाटील, अधिष्ठाता जगदीश पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी रवींद्र पाटील, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक योगेश पाटील आदी उपस्थित होते. त्यांचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्च चे संचालक प्रा. बी.व्ही. पवार तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!