जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पाटबंधारे विभागात कामे न करताच बिले काढले जात असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी नशिराबाद येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन रंधे हे सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जिल्ह्यातील हातनूर, वाघूर तसेच धरणाचे देखभाल दृष्टीची कामे करण्याच्या नावाखाली ठेकेदार काम न करता बिले काढून गैरव्यवहार करीत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात वेळोवेळी निवेदन दिले आहेत. तसेच पाटबंधाऱ्यातील विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातही संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या प्रतीही पाठवले आहेत, तरी रंधे हे दि.१७ मार्च २०२५ पासून आमरण उपोषणास बसले असून या स्थानिक कार्यालयाचे कार्यकारी संचालक, संबंधित अधिकारी यांनी झालेल्या भ्रष्टाचाराबाबत साधी विचारपूस करण्यासाठी अद्यापही धडकले नसल्याने याबाबत या भ्रष्टाचाराच्या बैलाच्या गुलदस्त्यात दडलय काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
■ स्थानिक अधिकाऱ्याची भूमिका नरमाईची का…?
संबंधित कार्यालयातील तापी पाटबंधारे महामंडळ अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेऊन भ्रष्टाचार दडपण्याचे काम केले आहे, असे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन रंधे यांनी निवेदनात म्हटले आहे.
