Home » महाराष्ट्र » सलमान खानला जीवे मारण्याची पुन्हा धमकी ; यावेळेस मागितली ५ कोटींची खंडणी !

सलमान खानला जीवे मारण्याची पुन्हा धमकी ; यावेळेस मागितली ५ कोटींची खंडणी !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिश्नोईची गँग सलमान खानच्या मागे हाथ धुऊन लागली आहे. अलीकडेच मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरला अटक केली आहे. सलमान खानला मारण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने २५ लाख रुपयांची सुपारी कशी घेतली हे या शूटरने सांगितले.

दरम्यान, सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई बाबत आणखी एक मोठे अपडेट समोर येत आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या जवळच्या सहकाऱ्याने पुन्हा एकदा सलमान खानला धमकीचा मेसेज पाठवल्याची बातमी समोर आली आहे.।ही धमकी मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवण्यात आली आहे.

मेसेजमध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमान खानला पाठवलेल्या मेसेजमध्ये भाईजानला हे जुने वैर संपवायचे असेल तर त्याला बिश्नोई गँगला ५ कोटी रुपये द्यावे लागतील, असे लिहिले आहे. ही धमकी हलक्यात घेतली तर बिश्नोई गँग सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट करेल. हा संदेश मिळताच मुंबई पोलीस कारवाईत आले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

बाबा सिद्दीकीच्या मृत्यूनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खानला जास्तीत जास्त वेळ घरी घालवण्यास सांगितले आहे. सलमान खान त्याच्या सिकंदर या चित्रपटाचे शूटिंग अतिरिक्त सुरक्षेत करणार आहे. आता तर सलमान खानच्या चाहत्यांनाही त्याची काळजी वाटू लागली आहे. या आठवड्यात सलमान खान बिग बॉस १८च्या विकेंड का वारसाठी देखील शूटिंग करणार नाही.

दरम्यान, सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी हरियाणातील पानिपत येथून एका संशयिताला अटक केली असून, सुक्खा कालूयाला असे त्याचे नाव आहे. पनवेल शहर पोलीस आणि हरियाणा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी करणे आणि जीवे मारण्याची सुपारी घेतल्या प्रकरणी सुक्खा कालूयाला वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुक्खा कालूयाला हा बिष्णोई गँगचा शार्प शुटर असून तो अनेक महिन्यापासून फरार होता. आज सुक्खा कालूयाला पनवेल कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!