Headlines
Home » जळगाव » डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात ‘ताण-तणाव व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळा संपन्न

डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात ‘ताण-तणाव व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि गोदावरी फाउंडेशनचे डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालय जळगाव, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ताण-तणाव व कॉपीमुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा आज दि.१८ रोजी सकाळी ८:३० वाजता आयोजित करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडवोकेट पूजा व्यास यांनी केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कडून दिवाळी २०२४ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आचारसंहिता देण्यात आलेली आहे. सदर आचारसंहिता विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली

तसेच कार्यक्रमाच्या मार्गदर्शक प्राचार्य डॉ.नयना महाजन यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे व अभ्यासाचे नियोजन करावयाचे सांगून स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला. परीक्षेचा ताण कसा कमी करता येईल यावरही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षाच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून ताण कसा कमी करावा यावर प्राचार्य डॉ.नयना महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्राध्यापकांचेही मार्गदर्शन घेण्याचे सुचवले.

यावेळी डॉ. महाजन यांनी परीक्षेचे गैरप्रकार व त्यासाठी असलेल्या शिक्षेचे स्वरूपही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी परीक्षा गैरप्रकार व त्याच्या दुष्परिणामांची जाणीव ठेवावी आणि परीक्षा प्रामाणिकपणे द्यावी यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऐश्वर्या आठवले यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व सर्व एलएलबी आणि बीए एलएलबी चे विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!