Headlines
Home » महाराष्ट्र » मराठा समाजाचे मागासलेपण सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द

मराठा समाजाचे मागासलेपण सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द

मुंबई, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )- मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपुर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ‘वर्षा’ निवासस्थानी आज सकाळी हा अहवाल सुपुर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतूक केले. या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मराठा आरक्षणाबाबत सरकारने याआधीच पूर्णपणे स्पष्ट केले आहे. शुक्रे समितीच्या अहवालाच्या आधारे आम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करू. कुणबी नोंदणी संदर्भात आरक्षणाचा मुद्दा अगोदरच पुढे नेण्यात आला असून त्यावर काम सुरु आहे. त्यासाठी उपोषण करण्याची गरज नव्हती. परंतु दुर्दैवाने असे होत आहे, त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे अशी आमची इच्छा आणि विनंती आहे. तसेच मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार सकारात्मकतेने काम करत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!